Join us

तनीषा मुखर्जी बनली ‘मराठी मुलगी’, खास अंदाजात दिल्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2020 16:08 IST

तनीषाचे मराठमोळ्या लूकमधील फोटो व्हायरल

ठळक मुद्देमध्यंतरी तनीषाचा जीजू अजय देवगण  आपल्या साळीसाठी एक टीव्ही शो प्रोड्यूस करणार असल्याची बातमी आली होती.

काजोल हे इंडस्ट्रीतील मोठे नाव आहे. दोन मुलांची आई झाल्यावरही काजोल इंडस्ट्रीत अ‍ॅक्टिव्ह आहे. चित्रपट करत आहे. आजही तिची क्रेज जराही कमी झालेली नाही. याऊलट काजोलची बहीण तनीषा मुखर्जी हिला इतक्या वर्षांनंतरही इंडस्ट्रीत जम बसवता आला नाही. बॉलिवूडमध्ये अनेक मोठमोठे प्रोजेक्ट करूनही तिला यश मिळाले नाही. पण म्हणून तनीषाची चर्चा कमी नाही. बॉलिवूडमध्ये अ‍ॅक्टिव्ह नसली तरी सोशल मीडियावर मात्र ती कमालीची अ‍ॅक्टिव्ह असते. आज 1 मे़ महाराष्ट्र दिन. आज महाराष्ट्र दिनी तनीषाचे मराठमोळ्या लूकमधील फोटो व्हायरल होत आहेत.

 या फोटोंमध्ये तनीषा पारंपरिक मराठमोळ्या लूकमध्ये दिसतेय. हे फोटो शेअर करत तनीषाने सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘माझी आजी आणि आई मराठी आहेत. मी आजीकडे गेली की ती मला बागेतील फुल तोडून त्याचा फुलांच्या माळा बनवायला सांगायची. आजीसोबत घालवलेले ते क्षण मी कधीच विसरू शकत नाही,’ अशी एक आठवणही तिने शेअर केली आहे. तनीषा मुखर्जी बॉलिवूडच्या काही चित्रपटांत दिसली़ पण बॉलिवूडमध्ये तिचा टीकाव लागला नाही. अखेर तिने तनीषाने टीव्हीकडे मोर्चा वळवला.

‘बिग बॉस’सारखे रिअ‍ॅलिटी शो सुद्धा केलेत. पण या शोनेही तनीषाला फार काही मिळाले नाही. ना नव्या आॅफर, ना लोकप्रीयता. मध्यंतरी तनीषाचा जीजू अजय देवगण  आपल्या साळीसाठी एक टीव्ही शो प्रोड्यूस करणार असल्याची बातमी आली होती. या शोमध्ये तनीषा मुख्य भूमिकेत दिसेल, असेही सांगितले गेले होते. मात्र अद्याप या शोची घोषणा झालेली नाही.

टॅग्स :काजोल