Join us

जॉन अब्राहम झळकणार रोहित शेट्टीच्या अ‍ॅक्शन-थ्रिलरमध्ये, लवकरच करणार शूटिंगला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 12:18 IST

John Abraham : अभिनेता जॉन अब्राहम सध्या त्याचा आगामी चित्रपट 'द डिप्लोमॅट'मुळे चर्चेत आहे.

बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) सध्या त्याचा आगामी चित्रपट 'द डिप्लोमॅट'(The Diplomat movie)मुळे चर्चेत आहे. अभिनेता त्याच्या पुढच्या चित्रपटासाठी प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी(Rohit Shetty)सोबत हातमिळवणी करत असल्याची माहिती समोर येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा एक ॲक्शन-थ्रिलर चित्रपट असणार आहे. सध्या त्याची कथा तयार केली जात आहे. या आगामी चित्रपटाचे शूटिंग एप्रिल २०२५ पर्यंत सुरू होऊ शकते, असे रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोहित शेट्टीला आता कॉप युनिव्हर्स आणि कॉमेडी फ्रँचायझीपासून वेगळे काहीतरी आणायचे आहे. अशा परिस्थितीत तो आता मुंबईचे माजी पोलीस सहआयुक्त राकेश मारिया यांचा बायोपिक बनवण्याच्या विचारात आहे. रोहित शेट्टी आणि जॉन अब्राहमच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग ४५ दिवस मुंबईत सुरू राहणार आहे. सध्या, रिपोर्ट्सनुसार, अभिनेता आणि दिग्दर्शक त्याच्या तारखांवर चर्चा करत आहेत. ते दोघेही उन्हाळ्यात याचे शूटिंग सुरू करू शकतात आणि त्यानंतर रोहित शेट्टी 'खतरों के खिलाडी १५'च्या शूटिंगमध्ये व्यस्त होईल. अशा परिस्थितीत ही बातमी समोर आल्यानंतर जॉन अब्राहमचे चाहते खूप उत्सुक झाले आहेत.

जॉनचा 'द डिप्लोमॅट' कधी रिलीज होणार?जॉन अब्राहमचा 'द डिप्लोमॅट' ७ मार्च, २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती जॉन अब्राहम, भूषण कुमार, समीर दीक्षित, अश्विन, राजेश बहल, विपुल शाह आणि कृष्णन कुमार यांनी संयुक्तपणे केली आहे. त्याच वेळी, 'नाम शबाना' आणि 'मुखबीर' सारख्या चित्रपट आणि वेब सीरिजसाठी ओळखल्या जाणाऱ्या शिवम नायरने दिग्दर्शन केले आहे.

टॅग्स :रोहित शेट्टीजॉन अब्राहम