Join us  

'सिलसिला'साठी जया बच्चन नव्हे तर 'या' अभिनेत्रीची झाली होती निवड, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2024 11:48 AM

Silsila Movie : 'सिलसिला' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा कमाल दाखवू शकला नाही. मात्र यातील गाणी आणि कलाकारांमुळे या चित्रपटाने रसिकांच्या मनात घर केले. यात अमिताभ बच्चन, जया बच्चन, रेखा, संजीव कुमार आणि संजीव कुमार, शसी कपूर असे दिग्गज कलाकार होते.

बॉलिवूडमध्ये असे अनेक सिनेमे आहेत, जे बॉक्स ऑफिसवर चालले नाहीत मात्र ते आजही कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे प्रेक्षकांच्या लक्षात राहिले आहेत. हे चित्रपट दमदार गाण्यांमुळे किंवा कलाकारांच्या अभिनयामुळे लोकांच्या मनावर छाप उमटवून कायम आहेत. यश चोप्रा दिग्दर्शित १९८१ साली रिलीज झालेला 'सिलसिला' सिनेमाचादेखील या यादीत समावेश आहे.

'सिलसिला' (Silsila Movie) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा कमाल दाखवू शकला नाही. मात्र यातील गाणी आणि कलाकारांमुळे या चित्रपटाने रसिकांच्या मनात घर केले. यात अमिताभ बच्चन, जया बच्चन, रेखा, संजीव कुमार आणि संजीव कुमार, शसी कपूर असे दिग्गज कलाकार होते. दरम्यान आता कित्येक वर्षांनंतर बॉलिवूडचा प्रसिद्ध खलनायक रंजीत यांनी सिलसिलासाठी अमिताभ आणि रेखा यांच्यासोबत जया बच्चन नाहीत तर दुसऱ्या अभिनेत्रीची निवड केली होती, असा खुलासा केला.  

'सिलसिला'साठी जया बच्चन नव्हत्या पहिली पसंतीखरेतर एएनआईला दिलेल्या मुलाखतीत अभिनेते रंजीत यांनी सांगितले की, सिलसिलासाठी पहिले रेखा, अमिताभ बच्चन आणि परवीन बाबीची निवड करण्यात आली होती. नंतर परवीन बाबींचा पत्ता कट झाला आणि जया बच्चन यांची वर्णी लागली. परवीन बाबींना का हटविले, या कारणाचीही हिंट दिली.

या कारणामुळे परवीन बाबींचा पत्ता झाला कटरंजीत यांनी सांगितले की, परवीन बाबी माझी चांगली मैत्री होती. त्या एकट्या होत्या. त्या खूप सुंदर महिला होत्या. त्या नेहमी हसत राहायच्या आणि आम्ही त्यांच्या दातांमुळे त्यांना फावडी म्हणायचो. एकदा त्या खूप त्रस्त होत्या आणि रडत होत्या. मी त्यांना विचारले, काय झालं.. आम्ही त्यावेळी काश्मीरमध्ये होते. तेव्हा त्यांनी मला सांगितले की, सिलसिलासाठी त्यांना कास्ट केले होते. मात्र नंतर सिनेमा सोडायला सांगितला. एका वादामुळे सिनेमात रेखा आणि जया यांना कास्ट करण्यात आले. नाहीतर चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत परवीन आणि रेखा दिसणार होत्या. 

टॅग्स :जया बच्चनपरवीन बाबी