Join us

'जवान'च्या एका गाण्यासाठीच लागले इतके कोटी रुपये, हजारो मुलींच्या गर्दीत किंग खानचा डान्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2023 15:13 IST

एका गाण्याच्या बजेटमध्ये अख्खा सिनेमा बनवून होईल

बॉलिवूडचा किंग शाहरुख खान (Shahrukh Khan) आगामी 'जवान' (Jawan) सिनेमाच्या कामात व्यस्त आहे. पठाण नंतर याही सिनेमाकडून त्याला अपेक्षा आहेत. चाहतेही सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 'जवान' चा प्रिव्ह्यू व्हिडिओ काही दिवसांपूर्वी रिलीज झाला आणि चाहत्यांच्या भलताच पसंतीस पडला. आता मेकर्स सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज करणार आहेत. 'जिंदा बंदा' गाण्याचं नाव आहे आणि हे गाणं चेन्नईत शूट करण्यात आलं आहे.

केवळ एका गाण्याचं बजेट १५ कोटी 

शाहरुखच्या 'जवान' सिनेमातील हे गाणं मोठ्या स्केलवर शूट करण्यात आलंय. पाच दिवसांच्या आत गाण्याचं शूट पूर्ण झालंय. विशेष म्हणजे गाण्यात चेन्नई, हैदराबाद, बंगलोर, मधुराई आणि मुंबईसारख्या शहरातील हजार पेक्षा जास्त डान्सर्स दिसणार आहेत. केवळ गाण्याचं बजेटच १५ कोटींपेक्षा जास्त आहे. यामध्ये शाहरुख १ हजार पेक्षा जास्त मुलींमध्ये डान्स करताना दिसणार आहे. 

साऊथ सिनेदिग्दर्शक अॅटलीने जवान दिग्दर्शित केला आहे त्यामुळे सिनेमाची जास्त चर्चा आहे.  सिनेमाची कास्टही तगडी आहे. साऊथस्टार विजय सेतुपती, साऊथची आघाडीची अभिनेत्री नयनतारा, प्रियामणि, दीपिका पदुकोण, सान्या मल्होत्रा यांचीही सिनेमात भूमिका आहे. दीपिकाचा सिनेमात स्पेशल अॅपिअरन्स असणार आहे.

टॅग्स :शाहरुख खानबॉलिवूडसिनेमा