Join us  

जय जय स्वामी समर्थ मालिकेत होणार नव्या पर्वाचा आरंभ; या प्रसिद्ध अभिनेत्याची होणार एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2023 8:00 PM

जय जय स्वामी समर्थ मालिकेत आता नव्या पर्वाचा आरंभ होणार आहे.

कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ मालिकेत आता नवी गोष्ट सुरु होणार आहे. स्वामी समर्थ यांच्या दिव्यतेचा अनुभव सगळ्यांनी प्रत्यक्षात अनुभवले असे नाही. पण, मालिकेत स्वामीसुत पर्वाचा आरंभ होणार आहे. जय जय स्वामी समर्थ मालिकेत आपला लाडका विकास पाटील साकारणार आहे स्वामीसुत. त्याबद्दल बोलताना तो म्हणाला, "हे खूप महत्वाचे पात्र आहे. कारण स्वामींनी त्यांना आपला  मानसपुत्र मानले होता. तुम्हाला मालिकेत बघताना कळेलच कसा त्यांना स्वामींवर विश्वास नव्हता, पण हळूहळू स्वामींनी त्यांना आपल्या जवळ घेतलं,आणि कश्याप्रकारे त्यांचे आयुष्य बदलून गेलं. मी खुपचं उत्सुक आहे या भूमिकेबद्दल कारण मी स्वतः स्वामी भक्त आहे, आणि मला  इतकं महत्वाचं पात्र करण्याची संधी मिळाली आहे हीच मी भाग्याची गोष्ट मानतो आणि त्यासाठी स्वामींनी माझी निवड केली यासाठी खूपच खुश आहे. 

खूप आव्हानात्मक आहे आधीचे हरिभाऊ आणि त्यानंतर स्वामीसुत... खूप साऱ्या गोष्टींचा विचार मी केला काळ वेगळा आहे त्यामुळे भाषेचा लहेजा, पोशाख असेल... खूप मोठी जबाबदारी आहे माझ्यावर, प्रेक्षक यावेळेस देखील भरभरून प्रेम करतील अशी आशा आहे मला".  

 

स्वामींचा प्रिय सुत, स्वामींनी ज्यांना आपले पुत्र मानले म्हणजेच हरिभाऊ तावडे ऊर्फ स्वामीसुत. स्वामींची कृपा लाभलेले आणि त्यांचे लाडके स्वामीसुत हे विलक्षण विभूतिमत्व होते. श्री. हरिभाऊ तावडे ऊर्फ स्वामीसुत हे म्युन्सिपालिटीमध्ये नोकरीला होते. हरिभाऊ तावडे यांच्या घरी त्यांची आई, पत्नी आणि मुलगी सिद्धा आहेत. कोणतीही गोष्ट टोकाला जाऊन करणं या त्यांचा स्वभाव आहे. स्वामींनी हरिभाऊंना स्वप्नात विविध रूपात दर्शन देऊन मोठ्या संकटातून वाचवणे असो ? नवस आणि अश्या गोष्टींवर विश्वास नसलेले हरिभाऊ यांचे थेट अक्कलकोटला जाणे असो... हरिभाऊ आणि रामाचार्याची भेट होणे, त्यानंतर चोळप्पा घरी जाण्याचा योग येणे असो आणि यातून त्यांना स्वामी दर्शन कसे लाभले आणि कसे त्यांचे जीवन बदलले हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे. आणि त्यानंतर रामाचार्याने काय प्रण घेतला ? आणि कशी स्वामीसुत यांना स्वामींची साथ लाभली बघूया.  

टॅग्स :कलर्स मराठी