Join us

हत्तींच्या संरक्षणासाठी काम करणार जॅकलीन

By admin | Updated: December 3, 2014 01:52 IST

अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस नेहमीच प्राण्यांचे संरक्षण आणि संवर्धनासाठी मदत करताना दिसते.

अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस नेहमीच प्राण्यांचे संरक्षण आणि संवर्धनासाठी मदत करताना दिसते. याच दिशेने एक पाऊल पुढे टाकत जॅकलीनने श्रीलंका वाईल्डलाईफ कंजर्व्हेशन सोसायटीचे सदस्यत्व स्वीकारले आहे. यावेळी जॅकलीनला हत्तींच्या सुरक्षेसाठी पावले उचलायची आहेत. या मिशनबाबत जॅकलीन सांगते की, ‘खेड्यापाड्यांत राहणाऱ्या आणि सर्वसाधारण लोकांपर्यंत हत्तींच्या महत्तेबाबत जागरूकता करणे गरजेचे आहे.’ सध्या जॅकलीन तिच्या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये खूपच बिझी आहे. रणबीर कपूरसोबतच्या रॉय, रेमो डिसुजाचा एक सुपर हीरो चित्रपट आणि रोहित धवनच्या चित्रपटात बिझी आहे. त्याशिवाय डेफिनेशन आॅफ फिअर या हॉलीवूड चित्रपटातही ती काम करीत आहे. एवढ्या बिझी कार्यक्रमांमधूनही जॅकलीन प्राण्यांच्या संरक्षणाच्या अभिनयासाठी वेळ काढते. ती पेटाच्या अनेक कँपेन्समध्ये सक्रिय सदस्य आहे.