Join us

गळ्यावर लव बाइट, गालावर किस; व्हायरल झाला जॅकलिन फर्नांडिस आणि सुकेशचा प्रायव्हेट फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2022 18:37 IST

Jacqueline Fernandez Viral Photo: अभिनेत्री विरोधात लुकआउट सर्कुलर जारी करण्यात आलं आहे. या कारणाने ती देश सोडून जाऊ शकत नाही. अशात आता जॅकलिन  आणि सुकेशचा एक प्रायव्हेट फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Jacqueline Fernandez Viral Photo: २०० कोटी रूपयांच्या फसवणुकीप्रकरणी तुरूंगात असलेला सुकेश चंद्रशेखर आणि अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या अफेअरची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. जॅकलिनची चौकशी करण्यासाठी ईडीकडून तिला सतत समन मिळत आहे. अभिनेत्री विरोधात लुकआउट सर्कुलर जारी करण्यात आलं आहे. या कारणाने ती देश सोडून जाऊ शकत नाही. अशात आता जॅकलिन  आणि सुकेशचा एक प्रायव्हेट फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये सुकेश जॅकलिनला किस करताना दिसत आहे. इतकंच नाही तर जॅकलिनच्या मानेवर लव्ह बाइटही दिसत आहे. जॅकलिनने प्रिंटेड टॉप घातला आहे. तेच सुकेश हुडीमध्ये दिसत आहे. याआधीही सुकेश आणि जॅकलिनचे प्रायव्हेट फोटो समोर आले होते. त्यातही जॅकलिन सुकेशला किस करताना दिसली होती. मात्र, चौकशी दरम्यान जॅकलिनने सुकेशसोबत डेट करत नसल्याचं सांगितलं.

सुकेश म्हणाला होता की, तो जॅकलिन फर्नांडिससोबत रिलेशनशिपमध्ये होता. त्याने अभिनेत्रीला अनेक महागडे गिफ्ट दिल्याचंही मान्य केलं होतं. जॅकलिनला त्याने छप्पन लाख रूपयांचा घोडा, कोट्यावधी रूपयांच्या गाड्या आणि महागडे दागिने दिले होते. रिपोर्ट्सनुसार सुकेश चंद्रशेखरने मनी लॉंन्ड्रिंगच्या कमाईतून २५ ते ३० कोटी रूपये जॅकलिनवर खर्च केले होते. जॅकलिनसोबतच नोरा फतेही सुद्धा याप्रकरणी साक्षीदार आहे. तिचीही ईडीने चौकशी केली होती. 

टॅग्स :जॅकलिन फर्नांडिससोशल व्हायरल