जॅकी भगनानी आणि लॉरेन गॉटिलीब यांची मैत्री रिअल आणि रिल लाइफमध्ये घट्ट आहे. ‘वेलकम टू कराची’ या आगामी चित्रपटासाठी गाणे कोरियोग्राफ करण्याविषयी दिग्दर्शक वासू भगनानीने लॉरेनला विचारले आणि ती लगेचच तयार झाली. ‘मेरा यार फन्टास्टिक’ या गाण्यावर एका रात्रीत लॉरेनने जॅकीला थिरकवले आणि आज हे गाणे प्रेक्षकांच्या पसंतीसही पडले आहे. म्हणूनच सध्या जॅकी रियल लाइफमध्येही ‘मेरा यार फन्टास्टिक’ असेच म्हणतोय.
जॅकी म्हणतो, ‘मेरा यार फन्टास्टिक’
By admin | Updated: May 24, 2015 23:36 IST