Join us
Daily Top 2Weekly Top 5

फराह खानच्या तालावर नाचणार जॅकी चॅन

By admin | Updated: March 22, 2016 13:30 IST

'कुंग-फू-योगा' या चित्रपटातील एका गाण्याचे नृत्यदिग्दर्शन फराह खान करणार असून जॅकी चॅन तिच्या तालावर नाचताना दिसेल.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २२ - अॅक्शन स्टार जॅकी चॅनचा 'कुंग-फू-योगा' हा चित्रपट सध्या ब-याच चर्चेत असून या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी तो भारतातही आला आहे. या चित्रपटात ज२कीसोबत सोनू सूद आणि अमेयरा दस्तूर हे बॉलिवूड सेलिब्रिटीही झळकणार आहेत. विशेष म्हणजे बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खान या चित्रपटासाठी एक खास ' आयटम नंबर' कोरिओग्राफ करणार असून आता जॅकी चॅन तिच्या तालावर नाचताना दिसणार आहे. 
यानिमित्ताने जॅकीच्या चित्रपटात पहिल्यांदाच एखाद्या गाण्याचा समावेश होणार आहे. अभिनेता सोनू सूदनेच त्याला या गाण्यासाठी तयार केले आणि कोरिओग्राफर म्हणून फराहचे नाव सुचवले. या गाण्याचे चित्रीकरण फक्त भारतात नव्हे तर चीन आणि इर देशांमध्येही गोणार आहे. या गाण्यात जॅकी कुर्ता, धोती आणि मोजडी या पारंपारिक भारतीय वेशातही दिसणार आहे. 
'कुंग-फू-योगा' हा अॅक्शनपट येत्या ऑक्टोबरमध्ये रिलीज होणार आहे.