Join us

शूटिंगवेळी डाएट करणे झाले कठीण

By admin | Updated: October 22, 2015 02:32 IST

चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं की, कलाकाराची तयारी सुरू होते. त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे डाएट! ‘राजवाडे अ‍ॅण्ड सन्स’ या चित्रपटासाठी, मृण्मयीला तर विशेष तयारी करावी लागली.

चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं की, कलाकाराची तयारी सुरू होते. त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे डाएट! ‘राजवाडे अ‍ॅण्ड सन्स’ या चित्रपटासाठी, मृण्मयीला तर विशेष तयारी करावी लागली. मोठ्या पडद्यावर आकर्षक आणि ग्लॅमरस दिसण्यासाठी किती मेहेनत घ्यावी लागते, हे आम्हाला सर्वांनाच लक्षात आलं. मृण्मयी सांगत होती, ‘माझ्या भूमिकेसाठी मला उंच सॅँडल्स घालून प्रॅक्टीस करावी लागली, शिवाय डाएट तर होतंच.’अतुल कुलकर्णी तर एरवीसुद्धा डाएट आणि व्यायामाच्या बाबतीत अतिशय जागरूक आहे. ‘एरवी मी सगळं काही खातो, अगदी चवीने. त्याच्या जोडीला योग्य तितका व्यायाम करतो. मात्र, शूटिंगच्या आधी मी खाण्यात गरजेपुरते थोडे-फार बदल करतो,’ असे अतुल सांगतो. सचिन खेडेकर यांनी तर त्यांची वेगळीच अडचण सांगितली. ते म्हणाले, ‘शूटिंग सुरू झालं की, आम्ही जरा खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवायला लागतो. प्रत्येक जण सुटेबल डाएट करत असतो. मात्र, जेव्हा शॉटमध्ये चमचमीत पदार्थ समोर येतात, तेव्हा मात्र गोची होते. ‘राजवाडे अ‍ॅण्ड सन्स’ मध्ये तर भरपूर सीन्स होते एकत्र जेवणाचे. मग आमच्यासमोर कधी मोदक येई, तर कधी तोंडाला पाणी सुटेल अशी जिलेबी, पण आमचा दिग्दर्शक त्या बाबतीत अतिशय कडक. जराही सूट द्यायचा नाही आम्हाला. त्यामुळे शॉटमध्ये तोंडात टाकलेले हे रुचकर पदार्थ शॉट संपेपर्यंत आम्ही फक्त तोंडात घोळवत असू.’शॉटमध्ये खोटं-खोटं खाणं हे सर्वात आव्हानात्मक असतं, अशी सिद्धार्थ कबुली देतो. आपण सुंदर, फ्रेश दिसावं, यासाठी मनावर प्रचंड ताबा ठेवत का होईना, पण हे करायला कोणाची तशी हरकत नसते, हे सगळेच कलाकार हे मान्य करतात.