Join us  

'ही वल्गरीटी नाही का ?' राहुल वैद्य दिशा परमारचा लिपलॉक फोटोवर चाहते नाराज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 2:58 PM

बिग बॉसच्या घरात राहुलने दिशाला प्रपोज केलं होतं. त्यानंतर ही जोडी सोशल मीडिया वर चांगलीच हीट ठरली. दरम्यान 2018 साली या दोघांची ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं आणि लग्नंबधनात अडकण्याचा निर्णय घेतला होता.

'बडे अच्छे लगते हैं 2' मालिकेमुळे घराघरात लोकप्रिय झालेली दिशा परमारला प्रचंड पसंती मिळाली.सध्या सोशल मीडियावर दिशा परमार चर्चेत आहे. त्याला कारणही तसे खासच आहे.गेल्याच वर्षी राहुल वैद्यसह लग्न करत दिशाने आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात केली.  बिग बॉसच्या घरात राहुलने दिशाला प्रपोज केलं होतं. त्यानंतर ही जोडी सोशल मीडिया वर चांगलीच हीट ठरली. दरम्यान 2018 साली या दोघांची ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं आणि लग्नंबधनात अडकण्याचा निर्णय घेतला होता.16 जुलैला मोठ्या थाटात दोघांचं  लग्न पार पडलं होतं . त्यांच्या लग्नातील फोटो  व्हिडिओज  सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.सोशल मीडियावर या जोडीला प्रचंड पसंती मिळत असते. लग्नानंतर दोघांच्या आयुष्यात काय सुरु आहे हे जाणून घेण्याचीही त्यांच्या चाहत्यांना प्रचंड उत्सुकता असते. 

सोशल मीडियावर लग्नानंतरही काही दिवस दोघांचीच चर्चा रंगली होती. लग्नानंतर दोघेही आपापल्या कामात बिझी झाले होते. दिशाही मालिकेच्या शूटिंगमध्ये बिझी झाली होती. अशा बिझी शेड्युअलमध्ये एकमेकांना वेळे देणं आणि त्याची सांगड घालणं दोघांसाठी तितकंसं सोपं नव्हतं. मात्र तरी जीवनातील काही विशेष प्रसंगी त्यांनी आजवर एकमेकांसाठी वेळ राखून ठेवला. त्यातच दोघांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले म्हटल्यावर सेलिब्रेशन तर होणारच.सध्या हे लव्हबर्डस युकेमध्ये त्यांची एनिव्हर्सरी सेलिब्रेट करण्यासाठी पोहचले आहे. दोघेही १० दिवस युकेमध्ये एकमेकांसह क्वॉलिटी टाईम घालवणार आहेत.

दरम्यान  राहुलने एनिव्हर्सरीच्या दिवशी सोशल मीडियावर दोघांचे काही रोमँटिक फोटो शेअर केले होते. सोशल मीडियावर या फोटोंनी सध्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये दोघेही एकमेकांना किस करताना दिसत आहेत. तर एका फोटोत लिपलॉक किस देताना दिसत आहेत. हे फोटो पाहून युजर्स संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत.अनेकांना त्यांचा असा अंदाज अजिबात रुचलेला नाही. अनेकांनी किसींग फोटो पाहून वल्गर असल्याचे म्हटलं आहे.तर इंडस्ट्रीतल्या अनेक कलाकारांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.  

टॅग्स :राहुल वैद्य