Join us
Daily Top 2Weekly Top 5

"त्याने मला मारहाण केली", 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री घेताच प्रसिद्ध अभिनेत्रीचे एक्स बॉयफ्रेंडवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2023 00:12 IST

'बिग बॉस १७' शोमध्ये टीव्हीवरील एक्स कपलही सहभागी झालं आहे. पण, एन्ट्री घेताच ते स्टेजवर भिडल्याचं पाहायला मिळालं.

छोट्या पडद्यावरील अतिशय वादग्रस्त पण तितक्याच लोकप्रिय असलेल्या 'बिग बॉस हिंदी'च्या नव्या पर्वाला आजपासून सुरुवात झाली आहे. 'बिग बॉस १७'ची गेल्या कित्येक दिवसांपासून प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. आता अखेर हा शो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. नुकताच 'बिग बॉस १७'चा ग्रँड प्रिमियर पार पडला. या शोमध्ये छोट्या पडद्यावरील अनेक लोकप्रिय कलाकारांनी एन्ट्री घेतली आहे. या शोमध्ये टीव्हीवरील एक्स कपलही सहभागी झालं आहे. 

अभिनेत्री ईशा मालवीय आणि अभिनेता अभिषेक कुमार यांनी 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री घेतली आहे. पण, एन्ट्री घेताच ईशा आणि अभिषेक स्टेजवरच भिडल्याचं पाहायला मिळालं. स्टेजवरच त्यांनी वाद घालायला सुरुवात केली. त्यांचं भांडण पाहून सलमान खानचीही बोलती बंद झाली होती. ईशाने अभिषेकवर गंभीर आरोप केले. शारीरिकरीत्या मारहाण केल्याचा आरोप ईशाने केला. यावर अभिषेकने उत्तर देत ईशावरही आरोप केले. ईशाने नखांनी मारहाण केल्याचं अभिषेक म्हणाला. नंतर सलमानने या दोघांची कानउघाडणी केली. पहिल्याच दिवशी ईशा आणि अभिषेक यांच्यात वाद झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे आता घरात हे दोघं किती गोंधळ घालणार हे पाहावं लागेल. 

ईशा आणि अभिषेक यांनी 'उडारिया' या मालिकेत एकत्र काम केलं होतं. या मालिकेत अभिषेक मुख्य भूमिकेत होता. ते रिलेशनशिपमध्ये होते. पण, मालिकेने निरोप घेतल्यानंतर त्यांचं ब्रेकअप झालं होतं. ब्रेकअपनंतर त्यांनी सोशल मीडियावरुनही एकमेकांना अनफॉलो केल्याचं समोर आलं होतं.

टॅग्स :बिग बॉससलमान खानटिव्ही कलाकार