Join us  

Isha Koppikar : 'मी पूर्णपणे खचले होते, त्याने मला एकटीला बोलवलं आणि..., ईशा कोप्पीकरचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2022 1:02 PM

Isha Koppikar Casting Couch Experience: ईशा कोप्पीकरने बऱ्याच सिनेमात एकापेक्षा एक बोल्ड आणि इंटीमेट सीन्स दिले आहेत. ईशा कोप्पीकरची इमेज बॉलिवूडमध्ये बोल्ड आणि मोस्ट डेअरिंग अभिनेत्री अशी होती.

Isha Koppikar Casting Couch Experience: बॉलिवूडमधील गैरप्रकार, पडद्यामागील अनेक विचित्र गोष्टी अभिनेत्रींनी अनेकदा सांगितल्या आहेत. आता या यादीत अभिनेत्री ईशा कोप्पीकरचंही नाव जुळलं आहे. ईशा कोप्पीकरने खुलासा केला की, ती सुद्धा कास्टिंग काउचची शिकार झाली होती. तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं की, कशाप्रकार एका बॉलिवूड अभिनेत्याला तिला एकटीला भेटायचं होतं. पण तिने त्याला नकार दिला. या घटनेनंतर ती धक्क्यात होती.

ईशा कोप्पीकरने बऱ्याच सिनेमात एकापेक्षा एक बोल्ड आणि इंटीमेट सीन्स दिले आहेत. ईशा कोप्पीकरची इमेज बॉलिवूडमध्ये बोल्ड आणि मोस्ट डेअरिंग अभिनेत्री अशी होती. पण यावेळी तिने हैराण करणारा खुलासा केला आहे.

ईशाने सांगितली घडलेली घटना

ईशाने सांगितलं होतं की, एका अभिनेत्याने तिला विना स्टाफ भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. जेव्हा तिने नकार दिली तेव्हा तिला सिनेमातून काढण्यात आलं. ईशाच्या याच वक्तव्यावर बॉलिवूड हंगामाने तिला प्रश्न विचारला. ती म्हणाली की, 'मी पूर्णपणे बिथरले होते आणि या सगळ्यातून माझा मूड गेला होता. कारण मला वाटत होतं की, तुम्ही कसे दिसता, तुम्ही काम कसं करता हे महत्वाचं आहे. पण खरंतर त्याहून तुम्ही हिरोच्या गुड बुक्समध्ये राहता आणि गुड बुक्सचा अर्थ हाच आहे'.

ती पुढे म्हणाली की, ' मला वाटतं आपल्या सर्वांच्या प्राथमिकता असतात. माझ्या जीवनात माझं जीवन कामापेक्षा जास्त महत्वाचं आहे. अखेर हा माझा अंर्तआत्मा आहे. मला आरशात बघण्याची आणि स्वत:बाबत चांगलं फिल करण्याची गरज आहे'. 

ईशाची वेबसीरिज 'दहानम'नुकतीच रिलीज झाली. ही वेबसीरिज हिंदी आणि तमिळ भाषेत आहे. सीरिजमध्ये ईशा एक पोलीस अधिकारी बनली आहे. ही सीरिज राम गोपाल वर्माने तयार केली आहे.

‘खल्लास गर्ल’ नावाने लोकप्रिय ईशा कोप्पीकरच्या करिअरमधील मुख्य सिनेमांमध्ये ‘पिंजर’, ‘कयामत’, ‘डरना मना है’ आणि ‘क्या कूल हैं हम’ यांच्यासहीत इतरही सिनेमे आहेत. तिने सिनेमे बॉक्स ऑफिसवर जास्त कमाल दाखवू शकले नाहीत. त्यानंतर हळूहळू ईशा इंडस्ट्रीतून गायब झाली. इंडस्ट्रीत काम मिळवणं इतकंही सोपं नाही, असा उल्लेख ईशाने पुन्हा एकदा केला. 

टॅग्स :इशा कोप्पीकरबॉलिवूड