Join us
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या ३ वर्षांनी यामी गौतम होणार आई? अनुष्कानंतर अभिनेत्रीचा व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2024 10:52 IST

यामीचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे ती गरोदर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. 

यामी गौतम बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'विकी डोनर', 'बाला', 'बत्ती गुल मीटर चालू', 'दसवी', 'ओएमजी २' अशा सुपरहिट सिनेमांमध्ये यामीने काम करून अभिनयाचा ठसा उमटवला. सध्या यामी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. यामीचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे ती गरोदर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. 

यामीने २०२१मध्ये आदित्य धारसोबत लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. पारंपरिक पद्धतीने केलेल्या यामीच्या लग्नाची प्रचंड चर्चा रंगली होती. आता लग्नानंतर ३ वर्षांनी यामी आई होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. यामी गौतमचा तिच्या पतीबरोबरचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामीच्या फॅन पेजवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत यामीने गुलाबी रंगाचा ओढणी ड्रेस परिधान केल्याचं दिसत आहे. पण, यामीने ओढणीने तिचं पोटही लपवल्याचं व्हिडिओत स्पष्ट दिसत आहेत. त्यामुळे ती गरोदर आहे का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. 

या व्हिडिओवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत. "ती गरोदर आहे," असं एकाने म्हटलं आहे. तर दुसऱ्याने "ती गरोदर आहे, असं वाटतंय...त्यांचं अभिनंदन", अशी कमेंट केली आहे. यामी गौतमचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. 

यामीच्या आधी अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा गरोदर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. बेबी बंप लपवतानाचा अनुष्काचा व्हिडिओ समोर आला होता. पण, अद्याप याबबात अनुष्का किंवा विराटने कोणत्याही प्रकारचं भाष्य केलेलं नाही. बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणही तिच्या मुलांबाबतच्या वक्तव्यामुळे चर्चेत आली होती. 

टॅग्स :यामी गौतमसेलिब्रिटी