Join us  

जाने तू या जाने ना फेम इमरान खान ८ वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये करतोय कमबॅक?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2023 2:44 PM

'जाने तू या जाने ना' या चित्रपटातून जिनिलिया देशमुखसोबत अभिनेता इमरान खानने डेब्यू केला होता. जिनिलिया आणि इमरान खानची जोडी प्रेक्षकांना भावली देखील होती.

'जाने तू या जाने ना' या चित्रपटातून जिनिलिया देशमुखसोबत अभिनेता इमरान खानने डेब्यू केला होता. जिनिलिया आणि  इम्रान खानची जोडी प्रेक्षकांना भावली देखील होती.  हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. आमिर खानचा भाचा इम्रान खान बऱ्याच दिवसांपासून पडद्यापासून दूर आहे. दरम्यान, आठ नंतर पुन्हा रुपेरी पडद्यावर परतणार असल्याची बातमी आहे. अभिनेत्याच्या कमबॅकची बातमी ऐकून त्याचे चाहते खूप उत्सुक आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेता अब्बास टायरवालासोबत ओटीटी ड्रामा अ‍ॅक्शन सीरिजसाठी पुन्हा एकत्र येणार आहे. वेबसिरीजचे काम आधीच सुरू झाले असून ते सध्या प्री-प्रॉडक्शन टप्प्यात आहे. या वर्षाच्या अखेरीस वेबसिरीज फ्लोरवर जाईल. यात  इम्रानचा वेगळा अवतार पाहायला मिळणार असून एका मोठ्या प्रॉडक्शन हाऊसद्वारे या मालिकेची निर्मिती केली जात आहे. इम्रान एका गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

इमरान खानने 'आय हेट लव्ह स्टोरी', 'आफ्टर ब्रेक', 'देल्ली-बेली, 'मेरे ब्रदर की दुल्हन' आणि 'वन्स अपॉन टाइम मुंबई अगेन' अशा अनेक चित्रपटात काम केले. २०१५ मध्ये आलेल्या 'कट्टी बट्टी' या सिनेमात तो कंगना रनौत सोबत तो शेवटचा दिसला होता. इमरान खानचे काही चित्रपट हिट झाले. परंतु त्यानंतर अनेक चित्रपट पूर्णपणे फ्लॉप झाले. त्यामुळे दिग्दर्शकांनी अभिनेत्याकडे कानाडोळा करायला सुरुवात केली.

गेल्या वर्षी इमरान पत्नी अवंतिका मलिकपासून विभक्त झाल्यामुळे चर्चेत आला होता. अवंतिका इमरानचं घर सोडून आपल्या आई-वडिलांसोबत राहत आहे. दोघांना एकत्र आणण्याचा दोन्ही कुटुंबानी बराच प्रयत्न केला. पण इमरान व अवंतिकाच्या नात्यातले मतभेद कायम राहिले. इमरानने 2011 साली अवंतिकासोबत लग्नगाठ बांधली होती. दोघांना इमायरा नावाची एक मुलगीही आहे.  

टॅग्स :इमरान खान