वयाच्या पन्नासाव्या वर्षीही फिट राहणारे अभिनेते कमी नाहीत; परंतु १८० किलोमीटर सायकलिंग, ४२ किलोमीटर रनिंग आणि ३.८ किलोमीटर स्वीमिंग आणि तीही अवघ्या १६ मिनिटांत पूर्ण करायचा म्हणजे आयर्नमॅनच पाहिजे. या आयर्नमॅनचा किताब अभिनेता मिलिंद सोमण यांनी नुकताच मिळविला. स्वित्झर्लंडची राजधानी असलेल्या झुरीचमध्ये या स्पर्धा झाल्या. मिलिंद सोमण यांनी नुकत्याच आलेल्या ‘नागरिक’ या चित्रपटातून पुनरागमन केले आहे. या चित्रपटात भ्रष्टाचारी राजकारण्याची भूमिका त्यांनी साकारली होती.
आयर्नमॅन मिलिंद सोमण
By admin | Updated: July 23, 2015 03:21 IST