Join us
Daily Top 2Weekly Top 5

सलमानच्या पुढच्या सिनेमात इरफानची वर्णी

By admin | Updated: November 19, 2016 02:36 IST

‘दबंग’ सलमान खानच्या बॅनरअंतर्गत तयार होणाऱ्या आगामी चित्रपटात अष्टपैलू अभिनेता इरफान खानची वर्णी लागली

‘दबंग’ सलमान खानच्या बॅनरअंतर्गत तयार होणाऱ्या आगामी चित्रपटात अष्टपैलू अभिनेता इरफान खानची वर्णी लागली आहे.‘लायन्स आॅफ द सी’ या इंग्लिश पिरीयड ड्रामा सिनेमाची सलमान निर्मिती करीत करणार असून त्यामध्ये इरफान मुख्य भूमिकेत दिसेल. ‘कोमगाटा मारू’ जहाजासंबंधीत घटनेवर हा चित्रपट आधारित आहे. ‘कोमगाटा मारू’ ही एक जपानी जहाज होती ज्यामध्ये ३४० शीख, २४ मुस्लिम आणि १२ हिंदू असे ३७६ भारतीय भारतावर ब्रिटीशांचे साम्राज्य असताना १९१४ साली कॅनडला स्थलांतर करत होते. परंतु त्यापैकी केवळ २४ लोकांनाच कॅनडामध्ये प्रवेश मिळाला. बाकी सर्वांना त्या जहाजाबरोबर पुन्हा भारतात रवाना करण्यात आले. हाँगकाँग येथून ही जहाज शांघाय (चीन) मार्गे योकोहामा (जपान) ते व्हँकुवरला (कॅनडा) गेली होती. विशेष म्हणजे यावर्षी मे महिन्यात कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन त्रुडो यांनी या घटनेविषयी जाहीर माफी मागितली. चित्रपटात इरफान ‘गुरदीत सिंग’ नावाच्या शीख व्यक्तीची भूमिका साकारणार आहे.