Join us  

मुंबई पुन्हा हरली! अमिताभ बच्चन निराश, पोस्ट करत म्हणाले- "मी मॅच पाहिली..."

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 12:13 PM

MI vs RR : मुंबईने राजस्थान रॉयल्सविरुद्धचा सामना हरल्यानंतर बिग बींची पोस्ट, म्हणतात - "

आयपीलचा १७वा हंगाम जोरदार सुरू आहे. सोमवारी यंदाच्या हंगामातील ३८वा सामना राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्समध्ये खेळवला गेला. मुंबईने या सामन्यात १८० धावांचं आव्हान राजस्थानसमोर ठेवलं होतं. राजस्थानने दमदार खेळी करत केवळ १ विकेट गमावत अगदी सहजरित्या या सामन्यात मुंबईवर विजय मिळवला. या सामन्यानंतर बिग बी अमिताभ बच्चन यांनी पोस्ट शेअर केली आहे. 

मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्सच्या सामन्यानंतर अमिताभ बच्चन यांनी X वरुन ट्वीट केलं आहे. "आयपीएल पाहिली...आता झोपुया", असं ट्वीट अमिताभ यांनी केलं आहे. अमिताभ यांनी हा सामना पाहिल्यानंतर नाराजी व्यक्त केली आहे. मुंबई आणि राजस्थानचा सामना झाल्यानंतर अमिताभ यांनी ब्लॉगमधूनही पोस्ट केली आहे. "मुंबई इंडियन्सचा पराभव झाल्यामुळे निराश आहे. दु:खी आहे...पण, आता वेगळा दिवस आणि वेगळ्या लाइफसाठी सज्ज", असं अमिताभ यांनी ब्लॉगमध्ये म्हटलं आहे.

मुंबईने दिलेलं १८० धावांचं आव्हान राजस्थानने ९ गडी राखून यशस्वीरित्या पेललं. हा सामना जिंकल्यानंतर एकूण ८ पैकी ७ सामन्यांमध्ये विजय मिळवल्याने राजस्थानने पाँइंट टेबलमध्ये अव्वल स्थान गाठलं आहे. पण, मुंबईला मात्र पुन्हा हार पत्कारावी लागली आहे. मुंबई इंडियन्सने ८ पैकी केवळ ३ सामने जिंकले आहेत. तर ५ सामन्यांत हार पत्कारावी लागली आहे. त्यामुळे त्यांच्या टॉप ४ मध्ये जागा मिळवण्याच्या आशा धुसर होत चालल्या आहेत. 

टॅग्स :अमिताभ बच्चनआयपीएल २०२४मुंबई इंडियन्सराजस्थान रॉयल्स