Join us

आमिर खानचा भाचा इमरान खानने घेतला अभिनयातून संन्यास, पत्नीला नव्हते हे मंजूर, अभिनेत्याच्या सासऱ्यांनी केला खुलासा

By गीतांजली | Updated: November 20, 2020 15:44 IST

अलीकडेच त्याचा जवळचा मित्र अक्षय ओबेरॉयने एका मुलाखतीत खुलासा केला आहे

बॉलिवूड अभिनेता आणि आमिर खानचा भाचा इमरान खान आपले अभिनयतील कारकीर्द सोडल्यामुळ चर्चेत आहे.  अलीकडेच त्याचा जवळचा मित्र अक्षय ओबेरॉयने एका मुलाखतीत खुलासा केला आहे की, इमरान यापुढे सिनेमांंमध्ये काम करणार नाही. इमरान खान दिग्दर्शनात आपला नशीब आजमवणार आहे. इमरान खानने मात्र याबाबत कोणताच खुलासा केलेला नाही. 

दैनिक भास्करच्या रिपोर्टनुसार इमरान खानने सासरे  रंजेव मलिक म्हणले, 'खरे सांगायचे तर इमरानचा  हा  वैयक्तिक निर्णय आहे आणि मला यात काही देणेघेणे नाही. पण हो, इमरानचे फिल्म स्कूलमध्ये शिक्षण झाल्यापासून दिग्दर्शनाकडे कल होता. तो त्यावर काम करीत आहे आणि तो दिग्दर्शनही करेल.

रंजेव मलिक पुढे म्हणाले की, इमरान आणि अवंतिका यांच्यातील दुरावा होण्यामागील एक कारण म्हणजे अवंतिकाची इच्छा होती की इमरानने अभिनय थांबवू नये आणि आपल्या करिअरमध्ये पुढे जावे. इमरानने या गोष्टी कसं तरी हाताळण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाला की, जर अभिनेता म्हणून त्याला चांगली भूमिका मिळाली तर तो नक्कीच करेल. 

अवंतिकाचे म्हणणे होते की, अभिनय केला नाही तर इमरानने निदान सिनेमाची निर्मिती करावी आणि ज्यात त्याने मुख्य भूमिका साकारावी. रंजेव मलिक पुढे म्हणाले की, इमरानने अभिनय कारकिर्दीला निरोप घेण्यापूर्वी कोणाशी सल्लामसलत केला नाही कारण त्याला आपल्या करिअरमध्ये कोणत्याही प्रकारचे हस्तक्षेप आवडत नाही.

इमरान खान आणि त्याची पत्नी अवंतिका मलिक यांच्या वैवाहिक आयुष्यात मतभेद सुरु आहेत, ही गोष्ट आता काही नवीन राहिली नाही.  24 मे 2019 ला अवंतिका इमरानचे घर सोडून निघून गेली. ती मुलगी इमेरासोबत तिच्या आई-वडिलांच्या घरी राहते आहे. दोघांच्या कुटुंबियांनी इमरान आणि अवंतिका यांच्यातील मतभेद दूर करण्याचा प्रयत्न केले. 8 वर्षांच्या डेटिंगनंतर दोघांनी 2011 मध्ये लग्न केले होते. 

टॅग्स :इमरान खान