Join us  

इमरान खान आणि त्याच्या पत्नीच्या नात्यातील दुरावा काही संपेना..., अवंतिकाच्या आयुष्यात तरूण अभिनेत्याची एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2023 4:15 PM

इमरान खानची पत्नी अवंतिकाच्या एका मिस्ट्री मॅनसोबतच्या नवीन पोस्टमुळे डेटिंगच्या चर्चांना उधाण आलं आहे.

Imran Khan-Avantika Malik: बॉलिवूड अभिनेता इमरान खान(Imran Khan)ने 2011 मध्ये अवंतिका मलिक (Avantika Malik)सोबत लग्न केले. काही वर्षांनी त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि तेव्हापासून दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले. आता अवंतिकाच्या एका मिस्ट्री मॅनसोबतच्या नवीन पोस्टमुळे डेटिंगच्या चर्चांना उधाण आलं आहे. अवंतिकाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर या व्यक्तीसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत जे आता व्हायरल होत आहेत.

अवंतिका सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. लग्न मोडल्याची वेदना तिने आपल्या अनेक पोस्टमधून व्यक्त केल्या आहेत. आता तिची एका मिस्ट्री मॅनसोबतची इन्स्टा पोस्ट व्हायरल होत आहे. आता अवंतिकाच्या आयुष्यात नव्या पार्टनरची एंट्री झाल्याचा अंदाज यूजर्स लावत आहेत. 

कोण आहे तो मिस्ट्री मॅन?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अवंतिका इमरान खानपासून वेगळी राहत आहे. तिने आपल्या इन्स्टा हँडलवर कुटुंबासोबतचे काही फोटो शेअर केले. या फोटोंमध्ये अवंतिका एका मिस्ट्री मॅनसोबत दिसत आहे. साहिब सिंग लांबा असे या व्यक्तीचे नाव असल्याचा दावा केला जात आहे. एबीपी न्यूजच्या रिपोर्टनुसार साहिब सिंग हा एक अभिनेता आहे जो इंडस्ट्रीत आपली ओळख निर्माण करण्यासाठी धडपडत आहे. अवंतिकाने #decemberdump हॅशटॅगसह तिच्या कुटुंबासोबतचे काही फोटो पोस्ट केले आहेत.  तिने साहिबसोबतचे काही सेल्फीही शेअर केले आहेत. अवंतिका साहेब एका कोलाजमध्ये हसत हसत पोझ देताना दिसत आहेत. हे फोटो न्यू इअर सेलिब्रेशनचं असल्याचा अंदाज आहे. 

इमरान खान आणि अवंतिका मलिक यांनी २०११ मध्ये लग्न केले आणि २०१४ मध्ये त्यांना एक मुलगी झाली. त्यानंतर 2019 मध्ये दोघे वेगळे झाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इम्रान आणि अवंतिका आता एकत्र नाहीत. दोघेही बऱ्याच दिवसांपासून एकमेकांपासून वेगळे राहत होते. या जोडप्याने अद्याप घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला नसल्याचे सांगितले जात आहे.

टॅग्स :इमरान खान