Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावर पोस्ट टाकायला मला भीती वाटते- दिशा पटानी

By admin | Updated: March 23, 2017 11:45 IST

मला सोशल मीडियावर पोस्ट टाकण्यास भीती वाटते

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 23 - सोशल मीडियात ट्रोलिंगची समस्येनं अनेक जण हैराण आहेत. समोरासमोर बोलता न येणा-या लोकांनाही सोशल मीडियावरून एखाद्याला टार्गेट करण्यात कमालीचं बळ येतं. अनेक जण सोशल मीडियाच्या माध्यमातून आक्षेपार्हटी पोस्ट टाकतात. अशाच काही पोस्टचा अभिनेत्री दिशा पटानीलाही त्रास झाला आहे. मला सोशल मीडियावर पोस्ट टाकण्यास भीती वाटते, असं वक्तव्य अभिनेत्री दिशा पटानी हिनं केलं आहे. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून तिला त्रास देणा-या लोकांना तिने ब्लॉकही केले होते. मात्र अद्यापही तिला सोशल मीडियावर पोस्ट टाकण्यास भीती वाटते, असं सांगितल्यानं ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ती म्हणाली, सोशल मीडियात कोणतीही पोस्ट करण्यापूर्वी मी सावध असते. जरा काही मुद्दा सापडला की लोक हैराण करून त्रास देतात. अशा आक्षेपार्ह पोस्ट करणा-यांना मी ब्लॉकही केले आहे. दिशा पटानी एका अ‍ॅपच्या लाँचिंगसाठी आली होती. त्यावेळी ती बोलत होती. पूर्वानुभवामुळे अजूनही मी काही लिहित असताना ब-याचदा घाबरून जाते. काहींचे गैरसमज होऊन आणि विनाकारण त्रास दिला जातो, असंही ती म्हणाली आहे. मात्र असे असले तरी दिशा सोशल मीडियात ब-यापैकी सक्रिय आहे. विशेषतः ती आपले फोटो नेहमी अपलोड करीत असते. धोनी चित्रपटातील भूमिकेमुळे लोकप्रिय झालेल्या या अभिनेत्रीला तिच्या टायगर श्रॉफबरोबरच्या प्रेम प्रकरणामुळेही सोशल मीडियात ट्रोल केले गेले होते. एमएस धोनीः द अलटोल्ड स्टोरी या चित्रपटातून तिची भूमिका लोकप्रिय झाली होती.