Join us
Daily Top 2Weekly Top 5

तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 20:45 IST

Suresh Wadkar on Madhuri Dixit: सुरेश वाडकर यांना माधुरी दीक्षितच्या कुटुंबाने त्यांच्यासाठी लग्नाचा प्रस्ताव आणला होता, याची आजही दोघांचेही करोडो चाहते चर्चा करत असतात...

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध पार्श्वगायक सुरेश वाडकर आणि 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षित यांच्यात लग्न जुळवण्याचा प्रस्ताव होता, अशी चर्चा अनेक दशकांपासून बॉलिवूडमध्ये होत आहे. वाडकर यांनी पुन्हा एकदा या जुन्या आणि गाजलेल्या अफवेवरचे मौन सोडले आणि संपूर्ण सत्य उघड केले आहे. 

'साहित्य आजतक' या कार्यक्रमात बोलताना सुरेश वाडकर यांना माधुरी दीक्षितच्या कुटुंबाने त्यांच्यासाठी लग्नाचा प्रस्ताव आणला होता का, असा थेट प्रश्न विचारण्यात आला. यावर हसतमुखाने उत्तर देताना वाडकर यांनी या प्रस्तावाची अफवा फेटाळून लावली.

ते म्हणाले, "माधुरी दीक्षितच्या कुटुंबाकडून माझ्यासाठी लग्नाचा प्रस्ताव आला होता, ही गोष्ट खरी नाही. काय झालं असेल ते देवाला माहीत, पण ही पतंग कोणी उडवली हे माहीत नाही. खरं सांगायचं तर ती पतंग आजही हवेत लटकत आहे."

माधुरी दीक्षितने 'परिंदा' (Parinda) सारख्या चित्रपटांसाठी त्यांच्या आवाजातील गाण्यांवर अभिनय केला आहे. मात्र, त्यांच्या लग्नाची बातमी निव्वळ अफवा होती. वाडकर यांनी मजेशीरपणे हे देखील सांगितले की, "माधुरी दीक्षित हे पाहणार आहे, ती मला जेव्हा भेटेल तेव्हा ती मला मारेलच, कारण मी ही अफवा अजूनही जिवंत ठेवली आहे.जर माधुरीने माझ्याशी लग्न केले असते तर ती आज माझ्यासोबत असली नसती का?"

लतादीदींनी दिली पहिली संधीयावेळी सुरेश वाडकर यांनी त्यांच्या कारकिर्दीतील सुरुवातीच्या दिवसांची आठवण करून दिली. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांची 'सरस्वती माता' म्हणून त्यांना मदत केली. लता मंगेशकर यांनीच 'प्रेम रोग' या चित्रपटासाठी राज कपूर यांच्यासह अनेक संगीतकारांना त्यांना संधी देण्याची शिफारस केली, ज्यामुळे त्यांना कधीच मागे वळून पाहावे लागले नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Suresh Wadkar addresses marriage rumors with Madhuri Dixit: Truth revealed!

Web Summary : Suresh Wadkar clarified that the rumor of a marriage proposal from Madhuri Dixit's family was false. He humorously added that if she had married him, she wouldn't be where she is today. He also credited Lata Mangeshkar for his initial career break.
टॅग्स :सुरेश वाडकर माधुरी दिक्षित