Join us  

"शिवाजी महाराज नसते तर तुमची आडनाव मुल्ला, खान अशी असती..", अश्विनी महांगडेचं वक्तव्य चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 1:11 PM

Ashwini Mahangade : अश्विनी तिच्या अभिनयाशिवाय सामाजिक कार्यामुळे चर्चेत येत असते. बऱ्याचदा ती आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवर आपलं मत व्यक्त करत असते.

अभिनेत्री अश्विनी महांगडे (Ashwini Mahangade) छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने मालिका, चित्रपट आणि नाटक अशा तिन्ही माध्यमात आपल्या अभिनयाची छाप उमटविली आहे. अश्विनी सध्या स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेमध्ये काम करते आहे. यात तिने अनघाची भूमिका साकारली आहे. या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळते आहे. अश्विनी तिच्या अभिनयाशिवाय सामाजिक कार्यामुळे चर्चेत येत असते. बऱ्याचदा ती आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवर आपलं मत व्यक्त करत असते. दरम्यान नुकतेच एका मुलाखतीत तिने शिवाजी महाराजांवरुन तिला ट्रोल करणाऱ्यांना चांगलंच उत्तर दिले आहे.

अश्विनी महांगडे म्हणाली की, ती सतत शिवाजी महाराजांचा उल्लेख करते म्हणून तिला सुनावलं जातं. मात्र आता शिवाजी महाराज नसते तर तुमचं आडनाव खान ,मुल्ला असतं, असं म्हटलंय. तिचं हे वक्तव्य चर्चेत आलं आहे. अजबगजब या पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत अश्विनी सांगितले की, काय तुम्ही सारखे शिवाजी महाराज शिवाजी महाराज करत असता. इतक्या वेगवेगळ्या विचारांची माणसं आपल्या आजूबाजूला आहेत. त्यावेळी मला त्यांच्याकडे पाहून हसू येतं.

ती पुढे म्हणाली की, जर महाराज नसते ना तर तुमची आडनावं मुल्ला, खान अशी काही असती. आता आपण हे सांगतो ना आम्ही बारा बलुतेदार, अठरापगड जाती हे हे आहोत, हे का सांगता तुम्ही? काय राहिलं असतं आपलं? अशा विरोधी बोलणाऱ्यांचा तेवढा अभ्यास नाही, त्यांची तेवढी कुवत नाही. अशा विचारांच्या लोकांना मी महाराजांबद्दल सांगितलं तर ते पॉजिटीव्हली घेणार नाही कारण त्यांना त्यांचे विचार बदलायचे नसतात. 

आपली उर्जा कुठे वाया घालवायची....मी हे कायम सांगते की आपल्यातला विद्यार्थी मरु द्यायचा नाही. ए मला सांगू नको हे मला सगळे येते हे असे जेव्हा घडते तेव्हा तुमच्यातला शिकणारा माणूस संपलेला असतो. या लोकांना सगळे येत असते म्हणजे ते अमेरिकेत सुद्धा स्वतःची सत्ता स्थापन करू शकतात इतके ते बलाढ्य विचारांचे असतात. त्यामुळे अशा लोकांसमोर आपली उर्जा कुठे वाया घालवायची. त्यापेक्षा खेडोपाड्यात महाराजांच्या विचारांचे लोक आहेत मी त्यांच्याशी बोलते, यातून त्यांना किती ऊर्जा मिळेल, असे या मुलाखतीत अश्विनी म्हणाली.

टॅग्स :अश्विनी महांगडेछत्रपती शिवाजी महाराज