सैफ अली खान व अमृता सिंग यांची मुलगी सारा अली खान हिने गतवर्षी बॉंलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. ‘केदारनाथ’ आणि ‘सिम्बा’ या दोनच चित्रपटांनंतर साराने बॉलिवूडमधील आपले स्थान पक्के केले. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर साराचे करिअर मार्गी लागले आणि सैफ व अमृता निश्चिंत झालेत. अर्थात मुलीच्या करिअरची चिंता संपली असली तरी मुलाच्या करिअरची चिंता मात्र अद्यापही बाकी आहे. पण आता सैफचा मुलगा इब्राहिम हाही बॉलिवूड डेब्यूसाठी सज्ज झाला आहे.डेक्कन क्रोनिकलने दिलेल्या वृत्तानुसार, इब्राहिमही बहीण साराप्रमाणे बॉलिवूडमध्ये करिअर करू इच्छितो. त्यामुळे आता सैफने इब्राहिमला लॉन्च करण्याची तयारी सुरु केली आहे. सूत्रांचे खरे मानाल तर, सैफ इब्राहिमसाठी एक चित्रपट प्रोड्यूस करणार आहे. अद्याप या चित्रपटाबद्दलचा तपशील कळू शकला नाही. पण इब्राहिमला बॉलिवूडमध्ये लॉन्च करण्याचा पापा सैफचा इरादा मात्र पक्का असल्याचे कळतेय.
पापा सैफ अली खानने सुरु केली लेकाच्या बॉलिवूड डेब्यूची तयारी!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 13:26 IST
साराचे करिअर मार्गी लागले आणि सैफ व अमृता निश्चिंत झालेत. पण मुलीच्या करिअरची चिंता संपली असली तरी मुलाच्या करिअरची चिंता मात्र अद्यापही बाकी आहे.
पापा सैफ अली खानने सुरु केली लेकाच्या बॉलिवूड डेब्यूची तयारी!!
ठळक मुद्देइब्राहिम सध्या केवळ १७ वर्षांचा आहे. वयाच्या ७ व्या वर्षी ‘टशन’ या चित्रपटात इब्राहिमने एक लहानशी भूमिका साकारली होती.