Join us  

सासूबाईंच्या वाढदिवसानिमित्त ह्रता दुर्गुळेनं शेअर केली खास पोस्ट, म्हणाली-

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2023 4:59 PM

ह्रताच्या सासूबाईंचं नाव मुग्धा शाह असून त्यादेखील छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत.

अनेक तरुणांची क्रश असलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे हृता दुर्गुळे (hruta durgule). उत्तम अभिनयासह सौंदर्यामुळे हृताने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यास सुरुवात केली. 'फुलपाखरु' या मालिकेपासून अभिनयाची सुरुवात करणाऱ्या हृताने मोठ्या पडद्यापर्यंत उडी मारली आहे. चित्रपटातील तिच्या अभिनयाचे कौतुक देखील प्रेक्षकांनी केलं आहे. हृता सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या आगामी प्रोजेक्ट्स वा पर्सनल लाइफविषयी माहिती देत असते.

ह्रताच्या सासूबाईंचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्ताने इन्स्टा स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. ह्रताच्या सासूबाईंचं नाव मुग्धा शाह आहेत. त्यादेखील छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. मुग्धा शाह यांचा आज ६० वा वाढदिवस आहे याचा उलगडा त्यांच्या सूनबाईंच्या पोस्टमधून झाला आहे. ह्रताने दोन स्टोरी पोस्ट केल्या आहेत.

यातील पहिल्या पोस्टमध्ये हॅप्पी बर्थ डे आई असं लिहिलंय. तर दुसऱ्या पोस्टमध्ये  ६० इतकी सुंदर कधीच नव्हती. ह्रता आणि तिच्या सासूबाईंमध्ये खास बॉन्डिंग आहे ते तिच्या पोस्टमधून अधोरेखित होतंय . हृता दुर्गुळेच्या सासूबद्दल सांगायचे तर, अभिनेत्री मुग्धा शाह या मराठी आणि हिंदी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. अनेक मराठी मालिकांमध्ये त्यांनी काम केले आहे. 'बे दुणे साडे चार', 'मिस मॅच', 'माहेर माझं हे पंढरपूर', 'संभव असंभव' सारख्या चित्रपटात त्या झळकल्या आहेत. 

तर हृताचा नवरा प्रतीक शाहदेखील हिंदी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध दिग्दर्शक आहे. त्याने 'बेहद २', 'कुछ रंग प्यार के ऐसे भी', 'तेरी मेरी एक जिंदडी', 'इक दिवाना था' या मालिकांचे दिग्दर्शन केले आहे.

टॅग्स :ऋता दूर्गुळे