Join us
Daily Top 2Weekly Top 5

हृता दुर्गुळेनं 'बिग बॉस १६'च्या फिनालेनंतर शिवची नाही तर शालिनची घेतली होती भेट, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2023 11:29 IST

Bigg Boss 16 : बिग बॉस १६चा ग्रॅण्ड फिनाले नुकताच पार पडला. यामध्ये पुण्याचा रॅपर एमसी स्टॅनने ट्रॉफीवर आपले नाव कोरत शोचे विजेतेपद आपल्या नावावर केले आहे.

छोट्या पडद्यावरील हिंदी लोकप्रिय आणि वादग्रस्त रिएलिटी शो बिग बॉसच्या सोळाव्या सीझनचा अंतिम सोहळा नुकताच पार पडला. यामध्ये पुण्याचा रॅपर एमसी स्टॅनने ट्रॉफीवर आपले नाव कोरत शोचे विजेतेपद आपल्या नावावर केले आहे. दरम्यान शोमधील टॉप ५ स्पर्धकांची विजेत्या इतकीच चर्चा होताना दिसून येत आहे. यामध्ये अभिनेता शालिन भनोटचासुद्धा समावेश आहे.

शालिन भनोट या शोच्या टॉप ५ स्पर्धकांमध्ये सहभागी होता. शो संपल्यानंतरसुद्धा सतत शालिन चर्चेत आहे. नुकतेच शालिन भनोट मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री हृता दुर्गुळेसोबत दिसून आला. हृताने हा फोटो शेअर केल्यानंतर अनेकांना प्रश्न पडला आहे की, शिव ऐवजी हृता शालिनची भेट का घेत आहे? तर शालिन भनोट हा हृताचा पती प्रतीक शाहचा खास मित्र आहे. या दोघानीं सुरुवातीपासूनच शालिनला पाठिंबा दिलेला दिसून आला होता. त्यामुळेच शालिन बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच या दोघांनी आपल्या मित्राची भेट घेतली आहे.

शालिन भनोट १३५ दिवस बिग बॉस १६च्या घरात राहिली. टॉप ५ स्पर्धकांच्या यादीतही त्याचा समावेश होता. मात्र, अंतिम फेरीच्या रात्री तो विजेत्याच्या शर्यतीतून बाहेर पडला. यामुळे तो खूपच निराश झाला होता पण नंतर जेव्हा एकता कपूरने त्याला व्हिडिओ संदेशाद्वारे तिचा एक शो ऑफर केला तेव्हा तो खूप आनंदी झाला. याशिवाय रोहित शेट्टीनेही त्याला 'खतरों के खिलाडी'मध्ये दिसण्याची संधी दिली होती पण त्याने नकार दिला.

टॅग्स :ऋता दूर्गुळेबिग बॉस