Join us

हृता दुर्गुळे -ललित प्रभाकरच्या 'आरपार' सिनेमातून सिनेइंडस्ट्रीला मिळाला नवा चेहरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 17:01 IST

मराठी सिनेइंडस्ट्रीत असे अनेक नवोदित कलाकार आहेत जे त्यांच्या अभिनयातून रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. अशातच आता एका मराठमोळ्या नवोदित चेहऱ्याच्या एंट्रीवर अनेकांच्या नजरा खिळल्या आहेत.

मराठी सिनेइंडस्ट्रीत असे अनेक नवोदित कलाकार आहेत जे त्यांच्या अभिनयातून रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. बरेचदा या कलाकारांची पहिलीच एंट्री अनेकांना भावते आणि आजही ही आपली मराठी इंडस्ट्री अनेक नव्या चेहऱ्यांना मोठं होण्याची संधी देते. अर्थात आपल्या इंडस्ट्रीची ही बाब वाखाणण्याजोगी आहे. अशातच आता एका मराठमोळ्या नवोदित चेहऱ्याच्या एंट्रीवर अनेकांच्या नजरा खिळल्या आहेत. ही अभिनेत्री म्हणजे जान्हवी सावंत (Jahavi Sawant). सध्या चर्चेत असलेल्या 'आरपार' (Aarpar Movie) या चित्रपटातून जान्हवीने सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केलं आहे.

'आरपार' चित्रपटात हृता दुर्गुळे-ललित प्रभाकरसह चित्रपटातील इतरही कलाकारांनीही त्यांच्या अभिनयाने चित्रपटाची उंची वाढविली. दरम्यान, चित्रपटात झळकलेल्या नव्या चेहऱ्याने साऱ्यांचं लक्ष वेधलं. ही नवी अभिनेत्री नक्की कोण?, असा प्रश्नही सर्वांनाच पडला. तर अभिनेत्री जान्हवी सावंत हिने 'आरपार' सिनेमातून सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले. या चित्रपटात तिने ललितच्या होणाऱ्या पत्नीची भूमिका साकारली आहे. तिची भूमिका, तिचा अभिनय प्रेक्षकांना भावले आहे आणि आरपारमुळे जान्हवीला विशेष प्रेम मिळाले. 

याबाबत जान्हवी म्हणाली, "'आरपार'मुळे मला सिनेइंडस्ट्रीत येण्याची संधी मिळाली याबाबत मी सर्वांची ऋणी आहे. हा माझा पहिलाच चित्रपट आहे. आणि पहिल्यांदाच अभिनय करताना खूप चांगल्या सहकलाकारांबरोबर स्क्रीन शेअर करायला मिळाली हे माझं भाग्यच म्हणायला हवं. 'आरपार' चित्रपटाने मला खऱ्या अर्थाने सिनेइंडस्ट्रीतील मार्ग मोकळे करुन दिले आहेत. आता आणखी बऱ्याच प्रोजेक्टवर काम करायचं आहे आणि मी उत्सुक आहे". 

टॅग्स :ऋता दूर्गुळेललित प्रभाकर