ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 24 - ह्रतिक रोशनचे काबिलमधील पोस्टर रिलीज झाले आहे. ह्रितक आणि यामी गौतम यांनी आपल्या ट्विटर वरुन हे पोस्टर चाहत्यासाठी ट्विट केले. उसकी कमज़ोरी ही उसकी ताकत है.. अस ट्विट करत ह्रतिकने हे पोस्टर ट्विट केले आहे. पोस्टरमध्ये मुख्य भुमिकेत असलेल्या ह्रितिकचा आगळावेगळा लूक पहायला मिळतो आहे. या चित्रिपटात तो एका अंध व्यक्तीची भूमिका करत आहे. या पोस्टरवर एक हटके टॅग लाईन आहे. ती लोंकाचं लक्ष वेधून घेते. मन सगळ काही पाहू शकतं अशी टॅग लाईन देण्यात आली आहे. यानंतर मोशन पोस्टरही रिलीज करण्यात येणार आहे.
या चित्रपटात ह्रितिक आणि यामी मुख्य भूमिकेत आहेत. तर राकेश रोशन यांनी दिगदर्शनांची जबाबदारी पेलली आहे.
उसकी कमज़ोरी ही उसकी ताकत है| #KaabilRevealed@YamiGautam@FilmKRAFTFilms@RakeshRoshan_N@_SanjayGupta@rohitroy500@RonitBoseRoypic.twitter.com/BdpGkNkhIP— Hrithik Roshan (@iHrithik) October 24, 2016