Join us

हृतिकला पाहायचायसोनमचा ‘खुबसुरत’

By admin | Updated: September 24, 2014 00:48 IST

अभिनेता हृतिक रोशनला सोनम कपूरच्या ‘खुबसुरत’ या चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी आमंत्रित करण्यात आलेले नव्हते

अभिनेता हृतिक रोशनला सोनम कपूरच्या ‘खुबसुरत’ या चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी आमंत्रित करण्यात आलेले नव्हते; पण तरीही त्याला हा चित्रपट पाहण्याची इच्छा आहे. १९८० मध्ये रिलीज झालेल्या खुबसुरत या चित्रपटाचा हा रिमेक आहे. या चित्रपटात हृतिकचे वडील राकेश रोशन मुख्य भूमिकेत होते. एका कार्यक्रमात जेव्हा रोशन कुटुंबियांना या चित्रपटाबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा राकेश रोशन म्हणाले की, ‘आम्ही हा चित्रपट पाहिला नाही,’ तर हृतिकने उत्तर दिले की, मला आमंत्रित करण्यात आले नाही, पण तरीही हा चित्रपट पाहण्याची माझी इच्छा आहे. माझ्या मते, हा एक लाजवाब चित्रपट असेल. सोनमचे खूप अभिनंदन.’ खुबसुरत या चित्रपटातून पाकिस्तानी गायक अभिनेता फवाद खान बॉलीवूडमध्ये पदार्पण करीत आहे. हा चित्रपट १९ सप्टेंबरला रिलीज झाला आहे.