‘बँगबँग डेअर’च्या माध्यमातून हृतिक रोशनने अनेक अभिनेत्यांना ‘चॅलेंज’ दिले आहे. ‘बँगबँग’ या आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हृतिक टि¦टरद्वारे इतरांना आव्हान देत असतो. शाहरुख खान, रणवीर सिंग, नर्गिस फाखरी, फरहान अख्तर, प्रियंका चोपडा, सोनम कपूर यांनी हृतिकचे ‘चॅलेंज’ पूर्ण केले आहे. रणवीरने चक्क रस्त्यावर नृत्य केले होते, तर फरहानने सायकल चालवली होती. नर्गिस फाखरीला रॅपर बनण्यास हृतिकने भाग पाडले होते, तर शाहरुखने आपल्या फिटनेस ट्रेनिंगचा व्हिडिओ जारी केला होता. आता त्याने सलमान खानला ‘चॅलेंज’ दिले आहे. सलमानचे व्यक्तिमत्त्व पाहता त्याला दिलेले ‘चॅलेंज’ काय असेल, याची सर्वाना उत्सकुता आहे; परंतु सलमानसाठी हे ‘चॅलेंज’ मात्र नक्कीच अवघड आहे. सलमानला एक पेंटिंग बनविण्याचे ‘चॅलेंज’ हृतिकने दिले आहे.