Join us
Daily Top 2Weekly Top 5

कितने दूर... कितने पास!

By admin | Updated: June 19, 2016 03:59 IST

कधी काळी त्या दोघांना एकमेंकापासून दूर राहाणे पसंत नव्हते. जिथे पाहावे, तिथे दोघं एकत्र दिसायचे. एकमेकांची कंपनी दोघंही एन्जॉय करायचे. बॉलीवूडच्या पार्ट्या ते सिनेमाचं स्क्रीनिंग सगळीकडे

कधी काळी त्या दोघांना एकमेंकापासून दूर राहाणे पसंत नव्हते. जिथे पाहावे, तिथे दोघं एकत्र दिसायचे. एकमेकांची कंपनी दोघंही एन्जॉय करायचे. बॉलीवूडच्या पार्ट्या ते सिनेमाचं स्क्रीनिंग सगळीकडे ते एकत्र पाहायला मिळायचे. हे लव्हबर्डस् म्हणजे बॉलीवूडचा बर्फी रणबीर कपूर आणि चिकनी चमेली कतरिना कैफ. मात्र, दोघांच्या नात्यात दुरावा काय आला आणि सगळं चित्रच पालटलेय. एकमेकांच्या हातात हात घालून वावरणारे हे लव्हबर्डस् आता एकमेकांपासून नजरा लपवतायत. याचीच प्रचिती 'उडता पंजाब' या सिनेमाच्या स्क्रीनिंगच्या वेळी आली. दोघांनी एकाच ठिकाणी सिनेमा पाहणंही टाळलं. कॅटने लाइट बॉक्स इथे आलिया आणि भट्ट कुटुंबीयांसह 'उडता पंजाब'च्या स्क्रीनिंगला हजेरी लावली, तर तिकडे रणबीरने जुहूच्या सनी सुपर साउंड्स इथे जाऊन 'उडता पंजाब' पाहिला. काही दिवसांपूर्वी लंडनमध्ये करण जोहरच्या पार्टीलाही कॅटने दांडी मारली. तिथे रणबीर असल्याने पार्टीला जाणे कॅटने टाळले. त्यामुळे बर्फी कपूर आणि चिकनी चमेली दोघांनाही एकमेकांपासून स्पेस हवाय, असेच दिसतेय.