मुंबई, दि. १८ - एकेकाळी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले रणबीर-कतरिना सध्या एकमेकांना टाळतानाच दिसतात. कधी काळी त्या दोघांना एकमेंकापासून दूर राहाणं पसंत नव्हतं, जिथं पाहावं तिथं दोघं एकत्र दिसायचे. बॉलीवूड पार्ट्यांपासून ते सिनेमाचं स्क्रीनिंग सगळीकडे बॉलीवुडचं हे क्युट कपल एकत्र पाहायला मिळायचं. हे
मात्र या दोघांच्या नात्यात दुरावा काय आला आणि सगळं चित्रच पालटलं. एकमेकांच्या हातात हात घालून वावरणारे हे लव्हबर्ड्स आता एकमेकांपासून नजरा लपवत असतात. याचीच प्रचिती 'उडता पंजाब' या सिनेमाच्या स्क्रीनिंगच्या वेळी आली. दोघांनी एकाच ठिकाणी सिनेमा पाहणंही टाळलं. कॅटनं लाइट बॉक्स इथं आलिया आणि भट्ट कुटुंबीयांसह 'उडता पंजाब'च्या स्क्रीनिंगला हजेरी लावली. तर तिकडे रणबीरनं जुहूच्या सनी सुपर साऊंड्स इथं जाऊन 'उडता पंजाब' पाहिला. काही दिवसांपूर्वी लंडनमध्ये करण जोहरच्या पार्टीलाही कॅटनं दांडी मारली. तिथं रणबीर असल्यानं पार्टीला जाणं कॅटनं टाळलं. त्यामुळं बर्फी कपूर आणि चिकनी चमेली दोघांनाही एकमेंकांपासून स्पेस हवाय असंच दिसतंय.