शाहरूख खान चाहत्यांच्या गळ्यातील ताईत आहे, हे कुणीही नाकारू शकत नाही. इतक्या वर्षांनंतरही शाहरूखची क्रेज जराही कमी झालेली नाही. याचमुळे शाहरूखची एक झलक पाहण्यासाठी लोक आतूर होतात. त्याच्या ‘मन्नत’ या बंगल्याबाहेर तासन् तास ताटकळत उभे राहतात. इतके कमी की काय म्हणून केरळच्या चाहत्यांनी याहीपुढे जात थेट हॉटेलच्या एका रूममध्ये शाहरूखचे ‘मंदिर’ थाटले. होय, तुम्हाला सहजी विश्वास बसणार नाही. पण हे खरे आहे. खुद्द काँग्रेस नेते शशी थरूर यांनी याबाबतचा खुलासा केला आहे.अलीकडे शशी थरूर केरळच्या दौ-यावर गेले होते. यादरम्यान मुन्नार येथील एका हॉटेलात त्यांनी काही तास मुक्काम केला. हॉटेलच्या रूमममध्ये शशी थरूर पोहोचले आणि त्यांना धक्काच बसला. अख्ख्या रूममध्ये केवळ आणि केवळ शाहरूखचे फोटो आणि कटआऊट्स होते. रूमची प्रत्येक भींत शाहरूखच्या फोटोंनी सजवण्यात आली होती. इतकी की, आराम करायलाही जागा मिळेना.
जिथे- तिथे शाहरुख...! शशी थरूर यांनी केले ट्वीट!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2019 15:47 IST
केरळच्या चाहत्यांनी थेट हॉटेलच्या एका रूममध्ये शाहरूखचे ‘मंदिर’ थाटले. होय, सहजी विश्वास बसणार नाही. पण हे खरे आहे. खुद्द काँग्रेस नेते शशी थरूर यांनी याबाबतचा खुलासा केला आहे.
जिथे- तिथे शाहरुख...! शशी थरूर यांनी केले ट्वीट!!
ठळक मुद्देतूर्तास शशी थरूर यांचे हे ट्वीट वेगाने व्हायरल होतेय. या ट्वीटमधील एका फोटोत शशी थरूर शाहरूखच्या एका कट्आऊटसोबत पोज देतानाही दिसत आहेत.