Join us
Daily Top 2Weekly Top 5

हॉलिवूडची ब्युटी आयकॉन मर्लिन मन्रोची पुण्यतिथी

By admin | Updated: August 5, 2016 14:25 IST

हॉलिवूडमधील 'शापित अप्सरा', मर्लिन मन्रो हिचा आज (५ ऑगस्ट) स्मृतिदिन.

संजीव वेलणकर
पुणे, दि. ५ - हॉलिवूडमधील 'शापित अप्सरा',  मर्लिन मन्रो हिचा आज (५ ऑगस्ट) स्मृतिदिन.
हॉलिवूडची सर्वाधिक लोकप्रिय सिनेतारका असलेल्या मर्लिनचा जन्म १ जून १९२६ रोजी झाला. तिच्या हयातीत 'डंब सेक्सी ब्लॉंड' असे हॉलिवूडने तिचे वर्णन केले. नेमक्या याच शब्दांनी आयुष्यभर तिचा पिच्छा सोडला नाही. ही प्रतिमा मोडून, नवे काहीतरी करण्याची जबरदस्त इच्छा असूनही मेरिलीन पुन्हा-पुन्हा त्यातच गुंतत गेली. कोटयवधी चाहत्यांना मेरिलीनने घायाळ केले..अजूनही करत आहे. आर्थर मिलर या बुद्धिमान साहित्यिकाच्या आयुष्यात येईपर्यंत हॉलिवूडमधील मेरिलीनचा प्रवास म्हणजे यशाची चढती कमान होती. पण लग्नानंतर आर्थर आणि मेरिलीन दोघांच्याही कारकीर्दीला उतरण लागली, ही दोघांचीही शोकांतिका..
बेसबॉलपटू ज्यो आणि आर्थर मिलर यांनी तिच्यावर जिवापाड प्रेम केले. सर लॉरेन्स ऑलिव्हिए, फ्रॅंक सिनात्रांपासून ते जॉन केनेडी यांच्यापर्यंत अनेकांना मेरिलीनने भुरळ घातली. पण तिचा पितृत्वाचा शोध आणि मातृत्वाची आस मात्र कधी पूर्ण झाली नाही. मॅरिलिनच्या आयुष्याची अखेरची वर्षे आजारपण, वैयक्तिक समस्या आणि कामातील कुचराई यामुळे वादग्रस्त ठरली. मृत्यूनंतरच्या काळात तिच्याकडे पॉप व सांस्कृतिक प्रतीक म्हणून तसेच आदर्श अमेरिकी लैंगिक प्रतीक म्हणून बघितले जाते. मर्लिन मन्रो यांचे ५ ऑगस्ट १९६२ निधन झाले.
लोकमत समूहातर्फे मा. मर्लिन मन्रो यांना आदरांजली.
संदर्भ. ग्लोबल मराठी