Join us

महिला अधिक समजूतदार - डेनियल्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2016 19:00 IST

महिलांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. त्यामुळेच प्रत्येक महिलांना आज पुरुषांच्या तुलनेत समान ...

महिलांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. त्यामुळेच प्रत्येक महिलांना आज पुरुषांच्या तुलनेत समान दर्जा दिला जात आहे. अर्थात हा दर्जा महिलांनी स्वत:च्या हिंमतीवरच मिळवला असून, महिला पुरुषांच्या तुलनेत अधिक समजदार असल्याचे मत दिग्दर्शक ली डेनियल्स यांनी व्यक्त केले आहे. डेनियल्स यांना त्यांच्या चित्रपटात महिलांची सशक्त भूमिका दाखविण्यास ओळखले जाते. फिमेल फर्स्ट डॉट को डॉट यूके या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार डेनियल्सने सांगितले की, मी माझ्या चित्रपटांमध्ये महिलांना प्राधान्य किंवा स्त्री प्रधान चित्रपटांची निर्मिती करण्यामागचे एकमेव कारण म्हणजे महिला पुरुषांच्या तुलनेत अधिक समजूतदार असतात. त्या सशक्त व धाडसी असतात. ‘द लेड शो विद स्टीफन कॉलबर्ट’ या कार्यक्रमात डेनियल्स म्हणाले की, महिलांवर आधारित चित्रपटांची निर्मिती करताना त्याविषयीचे लेखन करायला मला खूप आवडते. खरं तर महिलांमधील ऊर्जेला पाठबळ देण्यासाठी चित्रपट उत्तम माध्यम आहे. स्त्री प्रधान चित्रपटांची निर्मिती झाल्यास समाजामध्ये आणखी चांगला संदेश जाईल. त्यामुळे अधिकाधिक स्त्री प्रधान चित्रपटांची निर्मिती व्हायला हवी, असेही डेनियल्स यांनी सांगितले.