जेव्हा 'लुंगी डान्स' गाण्यावर थिरकला विन डिझेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2017 13:27 IST
विन डिझेलसह दीपिका पादुकोणचा डेब्यू सिनेमा 'xXx: रिटर्न ऑफ झेंडर केज' हा सिनेमाचा दणक्यात प्रिमियर पार पडलाय यावेळी सा-यांचे ...
जेव्हा 'लुंगी डान्स' गाण्यावर थिरकला विन डिझेल
विन डिझेलसह दीपिका पादुकोणचा डेब्यू सिनेमा 'xXx: रिटर्न ऑफ झेंडर केज' हा सिनेमाचा दणक्यात प्रिमियर पार पडलाय यावेळी सा-यांचे आकर्षण ठरले ते विन डिझेलने दीपिकाच्या सांगण्यावरून केलेला लुँगी डान्स. दीपिकाने लुँगी डान्सवर थिरकण्यासाठी विन डिझेलजला सांगितले. त्यावर विन डिझेलही मोठ्या उत्साहात या गाण्यावर थिरकताना दिसला.खुद्द दीपिकानेच विन डिझेलला लुंगी गुंडाळली, हातात काळा गॉगल देत ती ही चेन्नई एक्सप्रेसच्या लुँगी डान्स गाण्यावर रमताना दिसली. यावेळी दीपिका पादुकोणच्या अभिनयाच्या प्रेमात पडल्याची कबूली विन डिझेलने दिली.प्रिमिअरच्या सुरूवातीलाच विन डिझेलने दीपिकाचे खूप कौतुक केले. विन डिझेलने दिपिकावर कौतुकाचा वर्षाव करताना दीपिका एक परी आणि राणीप्रमाणे भासत असल्याचे म्हटले.यावर उत्तर देताना दीपिका म्हणाली मी विन डिझेलला पहिल्यांदा पाहिले तेव्हा स्तब्धच झाले होते. इतकेच नाही तर सिनेमाच्या शूटिंगच्यावेळी विन डिझेल हा टेडी बिअर सारखा दिसत असल्याचेही तिने विन डिझेलला सांगितेले होते. सिनेमाप्रमाणेच या प्रिमियरवेळीही या दोघांमध्ये खूप चांगली केमिस्ट्री असल्याचे पाहायला मिळाले.विन डिझेलसह काम करायाला मिळणे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट असल्याचे यावेळी दीपिकाने सांगितले. विन डिझेल भारतात येणार यासाठी दीपिकासह सारेच उत्सूक होते. विन डिझेलच्या स्वागतासाठी दीपिकाने खास तयारीही केली होती. खास या प्रिमियर सोहळ्यावेळी दीपिकाने गोल्डन रंगाचा वनपिस घातला होता. हॉलिवूड अभिनेता विन डिझेल आणि दीपिकाने ‘ट्रिपल एक्सः द रिटर्न ऑफ झेंडर केज’ चित्रिकरणादरम्यान अनेकदा चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून भेट दिली आहे.त्यामुळे प्रत्यक्ष पहिल्यांदाच ‘ट्रिपल एक्सः द रिटर्न ऑफ झेंडर केज’ या चित्रपटातील ही जोडी साक्षात भारतीय चित्रपट चाहत्यांच्या भेटीला येण्याचीही पहिलीच वेळ होती. ‘ट्रिपल एक्स’ सिनेमा मालिकेतील तिसरा आणि बहुप्रतिक्षित असा हा ‘ट्रिपल एक्स- द रिटर्न ऑफ झेंडर केज’ हा सर्व प्रथम भारतामध्ये 14 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाआधी मी विन डिझेसह एका सिनेमासाठी काम कर होतो,मात्र काही कारणामुळे तो प्रोजेक्ट यशस्वी होवू शकला नाही.अखेर एक 'ट्रिपल एक्सः द रिटर्न ऑफ झेंडर केज’ या सिनेमामुळे मी विन डिझेलसह ऑनस्क्रीन झळकणार असल्यामुळे माझा आनंद व्दिगुणीत झाला असल्याचे दीपिकाने सांगितले.ज्यावेळी सिनेमाची शूटिंगला सरूवात झाली होती. त्याचवेळी दीपिकाने भारतात या सिनमाचे भव्य प्रिमियर सोहळा आयोजित करण्याची इच्छा व्यक्त केली होती. दीपिकाला दिलेले वचन पाळत आज आम्ही भारतात तुमच्या भेटीला आलो आहोत असे विन डिझेलने यांवेळी सांगितले.