Join us

यशस्वी कलाकार बेन एफ्लेकला कशाचा होतोय पश्चात्ताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2017 22:29 IST

हॉलिवूड अभिमेना बेन एफ्लेकचे म्हणणे आहे की, त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठे स्वप्न पूर्ण झाले आहे. मात्र यासाठी त्याला खूप ...

हॉलिवूड अभिमेना बेन एफ्लेकचे म्हणणे आहे की, त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठे स्वप्न पूर्ण झाले आहे. मात्र यासाठी त्याला खूप मोठी किंमत चुकवावी लागली आहे. द गार्जियन डॉट कॉम या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार बेन एफ्लेक गॅँगस्टर यावर आधारित ‘लाइव बाय नाइट’ हा सिनेमा घेऊन येत आहे. या सिनेमाचे त्याने दिग्दर्शन तर केलेच शिवाय अभिनयही केल्याने त्याचे सर्व स्वप्न साकार झाल्याचे त्याला वाटत आहे. मात्र स्वत:ची ओळख सार्वजनिक केल्याने त्याला पश्चात्ताप होत आहे. त्यामुळे त्याने या सिनेमाची टॅगलाइनच ‘अमेरिकींचे स्वप्न किंमत मोजल्यानंतरच साकार होत असते’ अशी ठेवली आहे. याविषयी एफ्लेकने सांगितले की ‘होय, मी खरोखरच नशीबवान आहे, माझं सगळ्यात मोठं स्वप्न साकार झालं आहे. मात्र यासाठी मला माझ्या व्यक्तिगत आयुष्याचा लिलाव करावा लागला. सार्वजनिक चेहरा बनल्यानंतर तुमच्या आयुष्यातील बºयाचशा गोष्टी बदलून जातात. कारण माध्यमे तुमच्या व्यक्तिगत आयुष्यावर नेहमीच पाळत ठेवून असतात. त्यामुळे तुम्हाला असुविधांचा सामना करीत आयुष्य जगावे लागते. बेन एफ्लेक आणि  जेनिफर गार्नरएफ्लेकने सांगितले की, मीडिया माझ्या आयुष्यात नेहमीच ढवळाढवळ करीत असतो. मी या सर्व गोष्टींना अक्षरश: वैतागलो आहे. मात्र जेव्हा माझ्या मुलांवरून माध्यमांमध्ये बातम्या येतात, तेव्हा मला खूप पश्चात्ताप होतो. एफ्लेकला दोन मुली वायलट (१०), सेराफिना (७) आणि चार वर्षाचा सॅमुअल नावाचा मुलगा आहे. अभिनेत्री जेनिफर गार्नर हिच्याशी घटस्फोट घेतल्यानंतरही एफ्लेकने तिच्यासोबतचे मैत्रीपूर्ण नाते तोडलेले नाही. त्यामुळे हे दोघेही त्यांच्या तीन मुलांचे चांगले आई-वडील म्हणून ओळखले जातात. मुलांना सुरक्षितता आणि प्रसिद्धीपासून दूर ठेवण्याचा नेहमीच हे दोघे प्रयत्न करीत असतात. एफ्लेक म्हणतोय की, मी मुलांना माझ्यासारखे जीवन देऊ इच्छित नाही. त्यांनी सामान्य जीवन जगावे, हीच माझी इच्छा असेल. वॉर्नर ब्रदर्स निर्मित एफ्लेकचा लाइव बाय नाइट हा सिनेमा भारतात १३ जानेवारी रोजी रिलिज होणार आहे. मुलांसमवेत बेन एफ्लेक, जेनिफर गार्नर