Join us
Daily Top 2Weekly Top 5

काय सांगता? जस्टिन बिबर टिंडर वापरत नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2016 12:28 IST

पॉप स्टार जस्टिन बिबर त्याच्या ऐशोआराम आणि लॅविश लाईफस्टाईलसाठी प्रसिद्ध आहे. त्याच्या ‘रिलेशनशिप्स’ची यादीसुद्धा मोठी आहे. मग एवढ्या मुलींना ...

पॉप स्टार जस्टिन बिबर त्याच्या ऐशोआराम आणि लॅविश लाईफस्टाईलसाठीप्रसिद्ध आहे. त्याच्या ‘रिलेशनशिप्स’ची यादीसुद्धा मोठी आहे. मग एवढ्या मुलींना तो भेटतो तरी कसा? असा प्रश्न पडणे स्वभाविक आहे. याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न एलेन डिजनरसने केला.‘बेबी’ स्टार जस्टिन तिच्या शोवर आला असता त्याने डेटिंग, लव्ह लाईफ, करिअर, टूरवरील अनुभव अशा अनेक गोष्टींबद्दल दिलखुलास चर्चा केली. ‘द एलेन डीजनरस शो’वर येण्याची त्याची ही २६वी वेळ होती. यावेळी एलेनने त्याला विचारले की, तु कोणाला डेट करीत आहेस? यावर त्याने नकारार्थी उत्तर देत सांगितले की, मी कोणालाच डेट करीत नाहीए आणि मला या क्षणाला करायचेदेखील नाही. सध्या तरी मी ‘सिंगल’ लाईफ एन्जॉय करतोय.त्याचे हे उत्तर ऐकून एलेनने लगेच गुगली टाकत त्याला एक प्रश्न विचारला जो सध्या प्रत्येक सेलिब्रेटीला हमखास विचारला जातो. तो प्रश्न म्हणजे, तु टिंडर वापरतो का? नो डेटिंग : जस्टिन बीबर आणि एलेन डीजनरसटिंडर हे आॅनलाईन डेटिंग अ‍ॅप आहे ज्यावर तुम्ही इतर लोकांशी डेटिंगसाठी भेटू शकता. अमेरिकेत हे अ‍ॅप खूप लोकप्रिय आहे.टिंडर वापरण्याबाबत जस्टिन म्हणाला की, ‘मी टिंडर वापरत नाही.’ एलेनने आणखी खोदत विचारले, ‘तुझे टिंडरवर अकाउंट आहे?’‘नाही.’‘खरंच?’‘हो.’‘कोणतेच डेटिंग अ‍ॅप वापरलेले नाही?’‘नाही.’‘तुला कधी इच्छासुद्धा झाली नाही?’‘कधीच नाही.’‘म्हणजे सध्या तुझे आयुष्य मस्त चालू आहे. तुला डेटिंगच्या फंद्यात पडायचेच नाही तर?’‘निदान या क्षणाला तरी नाही.’डेटिंग अ‍ॅप : टिंडरजस्टिनच्या अशा ठाम नकारामुळे जगभरातील तमाम मुलींचे ‘हार्ट ब्रेक’ झाले असेल. पण सॉरी मुलींनो, तो डेटिंग अ‍ॅपही वापरत नाही आणि त्याला डेटिंगमध्येही इंटरेस्ट नाही.कार्यक्रमात जस्टीने एक सरप्राईज घोषणा करून चाहत्यांना खुशदेखील केले. अमेरिकेतील पहिली स्टेडियम टूर तो करणार असून पुढील वर्षी आॅगस्ट महिन्यात होणाऱ्या रोझ बाऊल इव्हेंटचे तिकिटसुद्धा उपस्थित प्रेक्षकांना दिले.