Join us

अ‍ॅँजेलिनाच्या विरहाने ब्रॅड पिटने हे काय केले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2016 20:33 IST

२०१६ या वर्षातील हॉलिवूडमधील सर्वाधिक धक्कादायक कुठली बातमी असेल तर ती ब्रँजेलिनाचा घटस्फोट ही होय. गेल्या कित्येक वर्षांपासून गुण्यागोविंदाने ...

२०१६ या वर्षातील हॉलिवूडमधील सर्वाधिक धक्कादायक कुठली बातमी असेल तर ती ब्रँजेलिनाचा घटस्फोट ही होय. गेल्या कित्येक वर्षांपासून गुण्यागोविंदाने संसार करणाºया या जोडप्याने वेगळे होण्याचा निर्णय घेतला अन् सगळ्यांनाच अवाक केले. खरं तर दोघेही एकमेकांच्या विरहाने खडतर आयुष्य जगत आहे. एकीकडे अ‍ॅँजेलिना जोलीने धूम्रपानाचा आधार घेतला, तर ब्रँड पिट चक्क प्लास्टिक सर्जरी करण्याचा निर्णय घेतला आहे. अ‍ॅँजेलिनाने घेतलेला घटस्फोटाचा निर्णय आणि मुलांची मिळत नसलेली कस्टडी या दोन कारणांनी त्याने हा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. एसशोबिज डॉट कॉम या वेबसाइटने एका सूत्राच्या दिलेल्या हवाल्यानुसार, पिट त्याच्या नकारात्मक मेंटॅलिटीमधून बाहेर पडण्यासाठी कॉस्मेटिक सर्जरीचा आधार घेऊ इच्छित आहे. पिटने फिलर्स (गालावरील खळ्या), बोटोक्स (चेहºयावरील सुरकत्या), पील्स (स्किनचा वरचा भाग काढणे) आणि डोळ्यांवर चेहºयाच्या आकारानुसार सर्जरी करण्याच्या विचारात आहे. सूत्रानुसार पिट अपराधी भावनेने लोकांमध्ये वावरत आहे. तो पूर्णपणे हतबल झाला आहे. आयुष्यातून सर्व काही गमविल्याचे दु:ख त्याच्या चेहºयावर स्पष्टपणे बघावयास मिळत आहे. मात्र त्याच्या जवळच्या नातेवाइकांनी त्याच्या या निर्णयाचा विरोध केला आहे. त्यांच्या मते, जर त्याने स्वत:च्या शरीराशी खेळण्याचा प्रयत्न केला तर तो ग्लॅमर जगतात नाकारला जाऊ शकतो. पण, काहीही असो घटस्फोटाच्या निर्णयामुळे अ‍ॅँजेलिना आणि पिट दोघेही पुरते हतबल झाले, हे मात्र नक्की. ब्रॅड पिट आणि अ‍ॅँजेलिना जोली