Join us
Daily Top 2Weekly Top 5

WATCH : बेवॉच ट्रेलर; का कमी केला प्रियांकाचा रोल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2016 14:37 IST

प्रियांका चोप्राच्या बहुचर्चित 'बेवॉच' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

बॉलिवूडमध्ये यशोशिखरावर असलेली आणि हॉलिवूडमध्ये नशीब आजमावणारी आघाडीची अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या बहुचर्चित 'बेवॉच' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.या चित्रपटाची गेल्या बऱ्याच काळापासून चर्चा सुरू होती, प्रियांकाला पाहण्यासाठी तिचे चाहतेही खूप उत्सुक होते. मात्र  नुकत्याचा रिलीज झालेल्या या पहिल्या ट्रेलरमध्ये प्रियांका अवघ्या एका सेकंदापेक्षाही कमी कालावधीसाठी दिसल्याने अनेकांची निराशा झाली आहे. बेवॉच या हॉलिवूडपटात प्रियांकासोबत झॅक एफ्रॉन, ड्वेन जॉन्सन, अॅलेक्झांड्रा डॅडारिओ, जॉन बॉस दिसणार हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या हॉलिवूडपटाचं मुख्य पोस्टर जुलैमध्ये प्रसिद्ध करण्यात आलं होतं.                                        चित्रपटात प्रियांका खलनायिकेची भूमिका साकारत असून तिचे हॅलोवीन स्वरूपातील स्पेशल पोस्टर ट्विटरच्या माध्यमातून प्रसिद्ध झालं होतं.बेवॉच कास्टत्यमुळे तिच्या भूमिकेबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. मात्र सध्या समोर आलेल्या ट्रेलरमध्ये तिची केवळ एक झलकच दिसल्याने तिचे चाहते निराश झाले असतील हे नक्कीच. पुढील वर्षी २६ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.