video : पॉपस्टार अरियाना ग्रांडेच्या कॉन्सर्टमध्ये दहशतवादी हल्ला; २० ठार, ५० जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2017 10:43 IST
पॉपस्टार अरियाना ग्रांडे हिच्या म्युझिक कॉन्सर्टमध्ये काल रात्री हाहाकार उडाला. अरियानाने गाणे सुरु केले तेव्हा, कॉन्सर्ट संपल्यावर इतकी भीषक घटना घडेल, असे अरियानाला स्वप्नातही वाटले नसेल. प्रत्यक्षात अरियानाचा कॉन्सर्ट संपत असतानाच याठिकाणी जोरदार स्फोट झालेत.
video : पॉपस्टार अरियाना ग्रांडेच्या कॉन्सर्टमध्ये दहशतवादी हल्ला; २० ठार, ५० जखमी
पॉपस्टार अरियाना ग्रांडे हिच्या म्युझिक कॉन्सर्टमध्ये काल रात्री हाहाकार उडाला. अरियानाने गाणे सुरु केले तेव्हा, कॉन्सर्ट संपल्यावर इतकी भीषक घटना घडेल, असे अरियानाला स्वप्नातही वाटले नसेल. प्रत्यक्षात अरियानाचा कॉन्सर्ट संपत असतानाच याठिकाणी जोरदार स्फोट झालेत. एकापाठोपाठ झालेल्या या दोन स्फोटात २० ठार तर ५० हून अधिक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. अरियाना या हल्ल्यातून थोडक्यात बचावली. ती सुरक्षित असल्याचे पोलिसांनी सांगितले. }}}}मँचेस्टर शहरातील सर्वांत मोठे इनडोर स्टेडियममध्ये रात्री १०.३० व्या सुमारास हे स्फोट झालेत. भारतात त्यावेळी पहाटेचे ३ वाजले होते. हा दहशतवादी हल्ला असल्याचे सांगण्यात येत आहे. अद्याप कुठल्याही अतिरेकी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही. हा दहशतवादी हल्ला असल्याचे स्पष्ट झाल्यास, २००७ नंतर लंडनमधील हा सर्वांत मोठा अतिरेकी हल्ला ठरेल. २००७ मध्ये दहशतवाद्यांनी अनेक बॉम्बस्फोट केले होते. त्यात सुमारे ५० लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. }}}} प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, दोन मोठ्या स्फोटांचा आवाज आला. पहिला स्फोट झाल्यानंतर गोंधळ उडाला. लोक जीवाच्या आंकाताने सैरावैरा पळू लागले. सोमवारी रात्री १०.३५ च्या सुमारास मँचेस्टर एरिना येथे स्फोट झाल्यानंतर पोलिसांना बोलावण्यात आले. या स्फोटाचे व्हिडिओही व्हायरल झाले आहेत. स्फोट झाल्यानंतर सैरावैरा पळणारे लोक त्यात दिसत आहेत. लोकांच्या चेहºयावरील दहशत यात स्पष्ट दिसते आहे. मँचेस्टर एरिना युरोपमधील सर्वात मोठे इनडोअर सभागृह आहे. १९९५ साली हे सर्वांसाठी खुले झाले होते. येथे मोठमोठे कॉन्सर्ट आणि खेळांचे आयोजन केले जाते.