व्हॅलेंटाइन डे अगोदरच झाले 'यांचे' ब्रेकअप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2017 21:57 IST
मॉडल तथा अभिनेत्री एंबेर रोज आणि तिचा डान्सर बॉयफ्रेंड वॉल मोकोवस्की यांच्यात व्हॅलेंटाइन डेच्या अगोदरच ब्रेकअप झाले आहे. गेल्या ...
व्हॅलेंटाइन डे अगोदरच झाले 'यांचे' ब्रेकअप
मॉडल तथा अभिनेत्री एंबेर रोज आणि तिचा डान्सर बॉयफ्रेंड वॉल मोकोवस्की यांच्यात व्हॅलेंटाइन डेच्या अगोदरच ब्रेकअप झाले आहे. गेल्या पाच महिन्यांपासून एकमेकांना डेटिंग करीत असलेले हे जोडपे व्हॅलेंटाइन डेच्या अगोदरच विभक्त झाल्याने त्यांच्या फॅन्समध्ये नाराजीचा सूर आहे. गेल्यावर्षी हे कपल डान्सिग विथ द स्टार्सच्या सेटवर एकत्र आले होते. यावेळी एंबेर रोज वॉल मोकोवस्की याचा भाऊ दिग्दर्शक मॅक्सिम मोकोवस्की याच्यासोबत काम करीत होती. त्याच ठिकाणी त्यांच्यात प्रेमसंबंध फुलले. दोघेही एकमेकांवर मनापासून प्रेम करीत होते. त्यांच्यातील रोमान्सच्या अफवा २०१६ मध्ये चांगल्याच पसरल्या होत्या. मात्र आॅक्टोबरमध्ये जेव्हा ते दोघे एका बर्थ डे पार्टीत बघावयास मिळाले तेव्हा त्यांच्यातील प्रेमसंबंधाला दुजोरा मिळाला. विशेष म्हणजे गेल्या महिनाभरापूर्वीच म्हणजे जानेवारीच्या सुरुवातीला एंबेर रोजी हिने बॉयफ्रेंड वॉलची प्रशंसा करताना म्हटले होते की, वॉल खरोखरच चांगली व्यक्ती असून, चार महिन्यांपासून त्याच्यासोबत राहण्याचा अविस्मरणीय अनुभव आहे. मी त्याच्यावर अन् त्याच्या परिवारावर प्रेम करते. कारण त्याच्या परिवारातील प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव मला भावणारा आहे. त्याच्यासोबत मी खूश असल्याचे तिने म्हटले होते. एंबेरने वॉलची केलेली प्रशंसा लक्षात घेता लवकरच हे दोघे लग्नाच्या बंधनात अडकणार असल्याची चर्चा रंगली होती. एंबेर तर दिवसाआड दोघांच्या रोमान्सचे बरेचसे फोटोही सोशल मीडियावर शेअर करीत होती. मात्र एंबेरच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेवटचा फोटो तब्बल तीन आठवड्यांपूर्वी शेअर केला गेलेला असल्याने दोघांच्याही फॅन्समध्ये चिंता व्यक्त केली जात होती. अखेर फॅन्सनी उपस्थित केलेली शंका खरी ठरली असून, या दोघांमध्ये ब्रेकअप झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे.