Join us

​अ‍ॅझिलियाचा रसेल क्रोसोबतच्या ‘त्या’ प्रसंगावर यू-टर्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2016 14:00 IST

रॅपर अ‍ॅझिलिया बँक्स आणि ‘ग्लॅडिएटर’ अ‍ॅक्टर रसेल क्रो यांच्यातील वाद आणखी चिघळणार असे दिसत असतानाच अ‍ॅझिलियाने माघार घेण्याचा निर्णय ...

रॅपर अ‍ॅझिलिया बँक्स आणि ‘ग्लॅडिएटर’ अ‍ॅक्टर रसेल क्रो यांच्यातील वाद आणखी चिघळणार असे दिसत असतानाच अ‍ॅझिलियाने माघार घेण्याचा निर्णय घेऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. गेल्या आठवड्यात रसेलने तिला हॉटेल रुममधून धक्के देऊन बाहेर काढल्याचा तिने आरोप केला होता.रसेल क्रोने माझा गळा दाबण्याचा प्रयत्न केला आणि चेहऱ्यावर थुंकून मला रुमच्या बाहेर धक्के देऊन बाहेर काढले असे ती म्हणाली होती. त्याच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्यासचे तिने सांगितले होते. मात्र आता ती असे काही करणार नसून या वादावर पडदा टाकणार असल्याचे कळतेय.एका मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने स्पष्ट केले की, मी रसेलवर कायदेशीर कारवाई करणार नाही. कारण, मला सध्या केवळ माझ्या संगीतावर लक्ष केंद्रित करायचे आहे. माझे म्युझिक करिअर पुढे न्यायचे आहे. कोर्ट-कचेरी करून वेळ वाया घालवायचा नाही. या स्कँडलचा माझ्या म्युझिकवर प्रभाव पडू नये म्हणून मी हा निर्णय घेतला आहे.त्या घटनेच्या वेळी उपस्थित अनेकांनी मात्र सर्व चूक अ‍ॅलिझियाची होती असे सांगितले. ‘२१२’ स्टार एकदम विचित्र वागत होती आणि त्यामुळे तिला बाहेर जाण्यास सांगण्यात आले. खरे तर तिच्यावरच रसेलने मानहानीचा दावा ठोकायला पहिजे अशासुद्धा प्रतिक्रिया उमटत आहेत. परंतु रसेल असे काही करण्याच्या मन:स्थितीत नसून हा दुर्दैवी प्रसंग मागे टाकू इच्छितो.