Join us

ट्विगी म्हणतेय, ‘आय हेट सेल्फी’

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2016 20:01 IST

एखाद्यास सेल्फीचे आकर्षण नसेल, असा व्यक्ती क्वचितच सापडेल. कारण सेल्फीने जगभरातील नेटिझन्सना अक्षरश: वेड लावले आहे. मात्र ब्रिटिश फॅशन ...

एखाद्यास सेल्फीचे आकर्षण नसेल, असा व्यक्ती क्वचितच सापडेल. कारण सेल्फीने जगभरातील नेटिझन्सना अक्षरश: वेड लावले आहे. मात्र ब्रिटिश फॅशन आयकॉन ट्विगी यास अपवाद आहे. कारण तिला सेल्फीचा प्रचंड तिटकारा वाटतो. एका वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार ७६ वर्षी ट्विगीचे म्हणणे आहे की, मला अजूनपर्यंत समजले नाही की लोक स्वत:च्या मोबाइलने स्वत:चाच फोटो का बरं काढतात. विशेष स्वत:च फोटो काढायचा अन् तो आॅनलाइन शेअर करायचा ही बाब समजण्यापलीकडची आहे. जेव्हा तिला जगातील तुला कुठली गोष्ट आवडत नाही असे विचारण्यात आले, तेव्हा तिने आवेशात येऊन सेल्फीबद्दल तिच्या मनातील तिटकारा व्यक्त केला. ती ऐवढ्यावरच थांबली नाही तर ज्या कोण्या व्यक्तीने सेल्फीचा शोध लावला त्याचा मी तिरस्कार करतेय, असेही ती म्हणाली. ट्विगीचे खरे नाव लेस्ली लॉसन असे आहे. जेव्हा तिचे फॅन्स तिला सेल्फी काढण्यासाठी विनवणी करतात तेव्हा तिला हा सर्व प्रकार विचित्र वाटतो. त्यातच ती जेव्हा नशेत असते, तेव्हा तर ती समोरच्या व्यक्तीशी वाद घालण्यासदेखील मागे पुढे बघत नाही. याविषयीचा तिने एक प्रसंगही यावेळी सांगितला. ती म्हणाली की, टॉयलेटमध्ये एका तरुण महिलेने माझ्यासोबत सेल्फी काढण्याची जिद्द केली. मी तिला तत्काळ नकार दिला. कारण तिची ही मागणी मला खूपच संताप देणारी होती. जेव्हा एखाद्या कॉकटेल पार्टीत असते तेव्हा तर लोक सेल्फीसाठी अक्षरश: उतावीळ होत असतात. सलग साठ दशकांपासून आयकॉन असलेल्या ट्विगीला तिच्या कामगिरीवर गर्व वाटतो. आयुष्यात बघितलेले सर्व स्वप्न साकार केल्याचे ती अभिमानाने सांगते. मात्र अशातही काही लोक जेव्हा न आवडणाºया गोष्टीसाठी हट्ट धरतात, तेव्हा आपण केलेल्या कामगिरीचा संताप होतो. वयाच्या ५०व्या वर्षात असतानाच मी मोठी भरारी घेतली होती. या काळात मी अनेक लोकांना भेटली मात्र आता जेव्हा लोकांशी भेट होतेय, तेव्हा आवडणाºया गोष्टींचा हट्ट धरला जातो. हे संतापजनक आहे, असेही ट्विगी म्हणते.