Join us
Daily Top 2Weekly Top 5

ट्रिपल एक्स दिग्दर्शकाला करायचेय अमिताभ बच्चन आणि रणवीर सिंगसोबत काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2017 16:49 IST

दीपिका पदुकोणची हॉलीवूड डेब्यू फिल्म ‘ट्रिपल एक्स : रिटर्न आॅफ झेंडर केज’चा भारतातील प्रीमियर एक यादगार सोहळा ठरला. चित्रपटाचा ...

दीपिका पदुकोणची हॉलीवूड डेब्यू फिल्म ‘ट्रिपल एक्स : रिटर्न आॅफ झेंडर केज’चा भारतातील प्रीमियर एक यादगार सोहळा ठरला. चित्रपटाचा दिग्दर्शक डीजे के रुसो आणि प्रमुख अभिनेता विन डिझेल तर भारीतयांच्या प्रेमातच पडले. ‘असे स्वागत आणि प्रेम आम्हाला कधीच मिळाले नाही’ अशा शब्दांत केरुसोने प्रतिक्रिया दिली.केरुसो दीपिकाचा फॅन असून त्याने ‘ट्रिपल एक्स’पूर्वीदेखील तिचे अनेक बॉलीवूड चित्रपट पाहिलेले आहेत. जेव्हा त्याला दीपिका स्टारर त्याचा आवडता चित्रपट कोणता असे विचारले तेव्हा त्याने ‘पिकू’ असे उत्तर दिले. तो म्हणाला, ‘अत्यंत भावना प्रधान चित्रपट आहे तो. त्यामध्ये दीपिकाच्या वडिलांची भूमिका करणारे अमिताभ बच्चन तर अप्रतिम अभिनेते आहेत. त्यांचे अनेक सिनेमे मी पाहिले आहेत. त्यांच्यासोबत काम करायला मला नक्कीच आवडेल.’बिग बीप्रमाणेच केरुसो दीपिकाचा बॉयफ्रेंड रणवीरसोबतही काम करण्यास उत्सुक आहे. रणवीरने ‘ट्रिपल एक्स’च्या सेटवर जाऊन दीपिकाची भेट घेतली होती. त्यावेळी तो काही दिवस सेटवर तिच्यासोबतच होता. तेव्हा केरुसो आणि त्याची मैत्रीसुद्धा झाली. त्याच्याबाबत केरुसो म्हणतो की, ‘त्याच्यामध्ये खूपच एनर्जी आहे. तो सेटवर आल्यामुळे दीपिका खूपच खुश झाली. घरापासून दूर राहिल्यामुळे तिला घरची आठवण येत होती. परंतु रणवीर आल्यामुळे तिचा मूड ठीक झाला. आमच्या युनिटमधील सर्वांचाच तो मित्र बनला. त्या दोघांना हॉलीवूड चित्रपटात एकत्र कास्ट केले तर मस्त जोडी जमून येईल.’अशी चर्चा आहे की, येत्या मे महिन्यापासून ‘ट्रिपल एक्स’च्या सिक्वेलचे विन डिझेल आणि दीपिकासह काम सुरू होणार आहे. तेव्हा रणवीरला त्यामध्ये रोल मिळू शकतो का असे विचारले असता केरुसो म्हणतो, ‘त्याच्यासाठी जर उत्तम काम असेल तर का नाही? चांगली संधी मिळाली तर मी नक्कीच त्याला कास्ट करेल.’