Join us
Daily Top 2Weekly Top 5

ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये निक्की ग्राहमचे अंडरगारमेंट बघून लोकांची बोलती बंद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2017 21:35 IST

‘बिग ब्रदर’ फेम निक्की ग्राहम तिच्या बोल्ड ड्रेसमुळे सध्या चांगलीच चर्चेत आहे. त्याचे झाले असे की, गेल्या शनिवारी निक्की ...

‘बिग ब्रदर’ फेम निक्की ग्राहम तिच्या बोल्ड ड्रेसमुळे सध्या चांगलीच चर्चेत आहे. त्याचे झाले असे की, गेल्या शनिवारी निक्की हॉलिवूड अभिनेता कीरन हायलर याच्या बर्थ डे पार्टीत अशा काही अवतारात पोहोचली होती की, लोक तिला बघत राहिले. पार्टीत आलेल्या निक्कीने काळ्या रंगाचा नेटवाला ड्रेस परिधान केला होता. हा ड्रेस पारदर्शक असल्याने तिने घातलेले अंडरगारमेंट यातून स्पष्ट दिसत होते. निक्की पार्टीत पोहोचताच लोक तिच्याकडे बघत राहिले. तर काहींनी मान खाली घालत तिच्यापासून दूर राहणे पसंत केले. निक्कीचा हा अंदाज असा काही हॉट होता की, अनेकांची बोलतीच बंद झाली होती. लंडन येथील गिलगामेश नाइट क्लबमध्ये झालेल्या या पार्टीत निक्कीचा वॅम्प लूक काही क्षणातच सोशल मीडियावर वाºयासारखा पसरला. निक्कीने या ट्रान्सपरंट ड्रेसवर डार्क मेहरून लिपस्टिक लावली होती. यामुळे ती खूपच मादक दिसत होती. त्याचबरोबर हाय हिल्स आणि गळ्यात काळ्या रंगाचा पट्टा घातलेला असल्याने निक्की खूपच सेक्सी दिसत होती. निक्की आणि कीरन बेस्ट फ्रेंड असून, दोघेही नेहमीच पार्टीत बघावयास मिळत असतात. त्यामुळे कीरनच्या पार्टीला निक्की नसेल असे होऊच शकत नव्हते; मात्र तिचा पार्टीतील अंदाज खुद्द कीरनचीही बोलती बंद करणारा ठरला. निक्कीचे खरे नाव निकोला रेशल बेथ ग्राहम असे आहे. निक्की एक ब्रिटिश मॉडल आहे. त्याशिवाय डिझायनर आणि टीव्ही पर्सनालिटीदेखील आहे. २००६ मध्ये ‘बिग ब्रदर-७’ या रिअ‍ॅलिटी शोमुळे चर्चेत आली होती. निक्की तिच्या बिंधास स्वभावासाठी ओळखली जाते. तिचा हा स्वभाव पार्टीत ठळकपणे बघावयास मिळाला.