Join us

​टिल्डा स्विंटनला वाटतो ‘हॅरी पॉटर’चा तिरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2016 14:10 IST

‘हॅरी पॉटर’ पाहून/वाचून वाढलेल्या आजच्या पीढीला टिल्डा स्विंटनचा कदाचित राग येऊ शकतो. कारण संपूर्ण जगात आवडीने पाहिले जाणारे ‘हॅरी ...

‘हॅरी पॉटर’ पाहून/वाचून वाढलेल्या आजच्या पीढीला टिल्डा स्विंटनचा कदाचित राग येऊ शकतो. कारण संपूर्ण जगात आवडीने पाहिले जाणारे ‘हॅरी पॉटर’ चित्रपट तिला मुळीच आवडत नाही. तिला तर त्यांचा प्रचंड राग येतो. आता असे काय कारण असू शकते की टिल्डाला हॅरी पॉटरचा तिरस्कार वाटावा?नुकतेच एका मुलाखतीमध्ये तिने सांगितले की, ‘मला हॅरी पॉटर चित्रपट बिल्कुल आवडत नाही. कारण त्यामध्ये हिंसक आणि मुलांसाठी मुळीच योग्य नसलेल्या ‘हॉगवर्ट’सारख्या बोर्डिंग स्कुलला रोमॅण्टिसाईज केले जाते. असा कल्पनाविलास मला पटत नाही. मी स्वत: बोडिंग शाळेत शिकलेले आहे. त्यामुळे सांगू शकते की आईवडिलांपासून दूर राहून बोर्डिंगचा मुलांना काहीच फायदा होत नाही.’हॅरी पॉटर सिनेमांत बोर्डिंग स्कुलचे अवास्तव चित्र रंगवण्यात येते असा तिचा आरोप आहे. टिल्डाचे शिक्षण केंट भागातील ‘वेस्ट हीथ गर्ल्स स्कुल’मध्ये झालेले असून त्या काळात तिला फार वाईट अनुभव आलेले आहे.हॅरी पॉटरलहान-निरागस मुलांना वाढत्या वयात अशा बंदिस्त ठिकाणी ठेवणे तिला अजिबात आवडत नाही. म्हणून तर चित्रपटातील ‘हॉगवर्ट’ या जादुच्या शाळेचा तिला राग येतो.म्हणून तर नुकतेच प्रदर्शित झालेल्या ‘फॅ नटॅस्टिक बीस्टस् अँड व्हेअर टू फार्इंड देम’ विषयी ती फारशी उत्साहित नाही. शेवटची ती ‘डॉक्टर स्ट्रेंज’ या चित्रपटात दिसली होती. पुढच्या वर्षी ती द. कोरियन सिनेमा ‘ओक्जा’मध्ये झळकणार आहे.