Join us
Daily Top 2Weekly Top 5

लैंगिक शोषणाविरोधात आवाज उठविणाºया ‘या’ अभिनेत्रीला जिवे मारण्याची दिली धमकी!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2017 17:40 IST

अभिनेत्री सलमा हायेक हिने हॉलिवूड निर्माता हार्वे विंस्टीन याला ‘क्रोधित राक्षस’ असे संबोधत त्याच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. ...

अभिनेत्री सलमा हायेक हिने हॉलिवूड निर्माता हार्वे विंस्टीन याला ‘क्रोधित राक्षस’ असे संबोधत त्याच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. तसेच त्याची पोलखाल केल्यामुळे त्याने मला जिवे मारण्याची धमकी दिल्याचेही तिने म्हटले आहे. बीबीसीच्या गेल्या बुधवारच्या रिपोर्टनुसार, हायेकने न्यू यॉर्क टाइम्समध्ये लिहिले की, हार्वे विंस्टीनने तिला एकदा म्हटले होते, ‘मी तुला जिवे मारणार, मला नाही वाटत की मी असे करू शकणार नाही.’ हायेकच्या या खुलाशानंतर हॉलिवूडमध्ये खळबळ निर्माण झाली असून, अनेक अभिनेत्रींनी हायेकच्या समर्थनार्थ हार्वे विंस्टीनविरोधात पुन्हा मोहीम सुरू केली आहे. दरम्यान, रोज मॅकगोवन, अ‍ॅँजेलीना जोली आणि ग्वेनेथ पाल्ट्रो या प्रसिद्ध अभिनेत्रींसह अनेकांनी हार्वे विंस्टीनवर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. परंतु निर्माता हार्वेने सलमा हायेकचे हे सर्व आरोप फेटाळून लावताना त्यास निराधार असे म्हटले आहे. बीबीसीने सलमा हायेकच्या या लेखावर विंस्टीनच्या प्रतिनिधीची प्रतिक्रिया घेण्यासाठी संपर्क साधला असता त्यांनी हे आरोप फेटाळून लावले. दरम्यान, या अगोदर अभिनेत्री जेनिफर लॉरेंस यांनीदेखील हार्वे विंस्टीनविषयी धक्कादायक वक्तव्य केले होते. जेनिफरने म्हटले होते की, हार्वेला ती तिच्या वडिलांसमान समजत होती. परंतु ते त्याच्या अगदी विपरीत असून, त्यांच्यात प्रचंड वासना असल्याचे तिने म्हटले होते. दरम्यान, हार्वे विंस्टीनवर आतापर्यंत ८० पेक्षा अधिक महिला सेलिब्रिटींनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. ज्यामध्ये कॅट बेकिंस्ले, कारा डेलेविंगन, अ‍ॅँजेलिना जोली, रोज मॅकगोवन यांसारख्या अभिनेत्रींचा समावेश आहे. जेव्हा हार्वेची पोलखोल करण्यात आली तेव्हा हॅशटॅक अंतर्गत जगभरात अभियान चालविले जात आहे. या अभियानात आतापर्यंत जगभरातील महिलांनी सहभाग घेतला असून, त्यांच्यासोबत झालेली आपबिती सांगितली आहे.