रिअॅलिटी टीव्ही स्टार किम कर्दाशिया हिच्यावर पॅरिस येथे झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर ती या घटनेतून सावरत असल्याचे दिसत आहे. गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियापासून अलिप्त राहणारी किम पुन्हा एकदा सोशल मीडियावर सक्रिय झाल्याने तिच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्याचबरोबर तिने या घटनेची आपबिती सांगण्याचे धाडस दाखविल्याने सगळ्यांनाच धक्का बसला आहे.
my son ❤ pic.twitter.com/YJq352YzoA— Kim Kardashian West (@KimKardashian) January 4, 2017
किमने गेल्या आठवड्यातच ट्विटरवर पती रॅपर कान्ये वेस्ट आणि मुलांसोबतचे काही फोटोज् शेअर केले आहेत. आता ती पॅरिस हल्ल्यातील आपबितीही लोकांसोबत शेअर करणार असल्याचे समोर आल्याने तिच्या चाहत्यांमध्ये याविषयी प्रचंड उत्सुकता आहे. ‘किपिंग अप विथ द करशिया’ या शोच्या पुढच्या सीझनमध्ये ती बहीण कर्टनी आणि ख्लो यांच्यासोबत ही आपबिती लोकांसोबत शेअर करणार आहे.
— Kim Kardashian West (@KimKardashian) January 4, 2017 एका वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, किमने तिच्या बहिणींना सांगितले की, पॅरिस येथे माझ्यावर हल्ला करणारे हल्लेखोर मला गोळ्या झाडणार होते. त्यांच्या तावडीतून बाहेर पडण्यासाठी माझ्याकडे कुठलाही मार्ग नव्हता. आताही तो प्रसंग आठवल्यास अंगावर शहारे येतात.