...यासाठी मुंबईत येणार सुपरमॉडेल गीगी हदीद!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2017 21:21 IST
सुपरमॉडेल गीगी हदीद या महिन्याच्या २७ तारखेला मुंबई येथे येणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. गीगीने टॉमी हिलफिगर ...
...यासाठी मुंबईत येणार सुपरमॉडेल गीगी हदीद!
सुपरमॉडेल गीगी हदीद या महिन्याच्या २७ तारखेला मुंबई येथे येणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. गीगीने टॉमी हिलफिगर या बॅण्डशी टायअप केले असून, ‘टॉमी-गीगी हिलफिगर स्प्रिंग २०१७’च्या कलेक्शन लॉन्चिंगसाठी ती येणार आहे. मुंबईत गीगीचे स्वागत बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर करणार आहे. वास्तविक सोनमला तिच्या हटके फॅशनसाठी ओळखले जात असल्याने तिला या कार्यक्रमासाठी खास आमंत्रित करण्यात आले आहे. यावेळी सोनम आणि गीगी फॅशनविषयी चर्चा करणार आहे. गीगीने टॉमी हिलफिगर कलेक्शनबरोबर टाय-अप केल्याने तिला या कलेक्शनचे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून घोषित करण्यात आले असून, ती २०१६ पासून या कलेक्शनच्या ब्र्रॅण्डिंगसाठी जगातील विविध देशांमध्ये टूर करीत आहे. दरम्यान, गीगी तिच्या मुंबई टूरदरम्यान पत्रकारांशी संवाद साधण्यासाठी एका प्रेस कॉन्फ्रेन्समध्ये उपस्थित राहणार आहे. त्याचबरोबर पल्लादियम मॉललादेखील भेट देणार आहे. यावेळी ती तिच्या चाहत्यांशी संवाद साधणार असून, त्यांना टॉमी हिलफिगर कलेक्शनविषयीची माहिती देणार आहे. यापूर्वी गीगीने न्यूयॉर्क, बर्लिन, दुबई, टोकियो, शांघाय, लॉस एंजेलिस, अमस्टरडॅम, लंडन, मिरन, पॅरिस येथे कलेक्शनच्या ब्रॅण्डिंगसाठी टूर केली आहे. तिच्या या लॉन्ग टूरविषयीचे अनुभव सागताना गीगी म्हणतेय की, या टूरदरम्यान फॅन्सच्या भेटी आणि टॉमी-गीगी कलेक्शनच्या ब्रॅण्डिंगचा अनुभव अविस्मरणीय असा होता. आता मी मुंबई टूरविषयी उत्सुक असून, या हंगामातील आमची ही अखेरची टूर असेल. तर सोनम कपूरने म्हटले की, गीगीचे भारतात स्वागत करण्यास मी उत्सुक आहे. मी नेहमीच टॉमी हिलफिगर ब्रॅण्डची चाहती राहिली आहे. त्यातच टॉमी-गीगी एकत्रित आल्याने हे एक परफेक्ट कलेक्शन झाले आहे. दरम्यान, या समर कलेक्शनमध्ये नावीन्यता असून, त्याची जगभरात चर्चा घडून येत आहे. टॉमी-गीगी कलेक्शनचे ग्लोबल लॉन्चिंग ८ फेब्रुवारी २०१७ मध्ये वेनिस बीच येथे झालेल्या किककॅस शोदरम्यान करण्यात आले होते. याठिकाणी या कलेक्शनचे सादरीकरण करण्यात आले होते. ‘रंगून’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अभिनेत्री कंगणा रानौत हिने याच कलेक्शनचे जो रेड बॉम्बर जॅकेट आणि टॅण्क टॉप परिधान केला होता.